Crime 
सोलापूर

खळबळजनक ! सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल; "या' तहसीलदारांनी दिली "या' सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध फिर्याद 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : बदनामी होईल असा मजकूर फेसबुकवरून व्हायरल केल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याच्याविरुद्ध तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून डॉ. वैशाली वाघमारे या कार्यरत आहेत. 15 जुलै 2020 रोजी पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याने कसलाही अधिकार नसताना व कसलीही खातरजमा न करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवरून व्हायरल केली. बदनामी होईल अशा या मजकुराची दखल घेऊन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सागर चव्हाण याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गाडेकर पुढील तपास करीत आहेत. महिला तहसीलदारांनी फेसबुकवरील पोस्टची गंभीर दखल घेऊन कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT