logo 
सोलापूर

ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम मतदार यादी सोमवारी होणार प्रसिद्ध 

प्रमोद बोडके

सोलापूर : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने प्रस्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्याने या हरकतींचा निपटारा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मुदत दिली आहे. 

पूर्वी 10 डिसेंबरला प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी आता सोमवारी (ता. 14) प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या प्रारुप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यामुळे नाशिक, जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीची विनंती केली होती. राज्यातील इतर जिल्ह्यांकडूनही याबाबत आयोगाकडे विचारणा होत होती. हरकतींची संख्या पाहता निवडणूक आयोगाच्यावतीने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

दरम्यान 14 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 16 डिसेंबरला होणार आहे. गावगाड्याच्या राजकारणातील दोन महत्वाच्या प्रशासकीय घटना पुढील आठवड्यात घडणार असल्याने गावातील पुढाऱ्यांचे आणि इच्छुकांचे या प्रक्रियांकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT