Final year students exams canceled Best of two option for students who do not want a grade
Final year students exams canceled Best of two option for students who do not want a grade 
सोलापूर

Big Breaking! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू'चा पर्याय

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा वाढत असलेल्या विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या  पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनवरून 50 टक्के गुण देऊन त्यांचे ग्रेडनुसार मूल्यांकन केले जाणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना अपग्रेडेशनसाठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशनची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला पूर्वी दिलेल्या ग्रेडपेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील. अन्यथा पूर्वीचा ग्रेड तसाच राहणार आहे.

प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 16 ते 31 मे पर्यंत या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचेही नियोजन ठरले होते. मात्र, कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झालेली नाही. आता पावसाला सुरुवात होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना व मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्यास अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे मुंबई पुणे सोलापूर औरंगाबाद जळगाव यासह अन्य जिल्ह्यांमध्येही कोरोना चा संसर्ग वाढत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 पैकी 11 विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले आहे. 

कुलगुरूंचा हट्टीपणा कशासाठी....
अल्पावधीतच राज्याच्या टॉप टेन यादीमध्ये गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, असे मत नोंदविले आहे. सोमवारी (ता. 26) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 13 विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी त्यांनी प्रत्येक विद्यापीठाच्या परिसरातील कोरोना संसर्गाची स्थिती जाणून घेतली. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत असलेल्या अडचणीही जाणून घेतल्या. दरम्यान, राज्याच्या टॉप टेन यादीमध्ये सोलापूर व पुणे असतानाही या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरुंनी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी काहीही नसल्याचे केले आहे. आम्ही विद्यार्थी व पालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सर्व्हे केला आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा उपलब्ध असून त्यानुसार परीक्षा घेता येतील, असे या दोन्ही कुलगुरूंनी बैठकीमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे मात्र, परस्थिती वेगळी असतानाही त्यांनी केलेल्या सर्व्हेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तत्पूर्वी, राज्यातील कोणत्‍याही विद्यापीठाची परीक्षा काही कारणास्तव रद्द झाल्यास तो निर्णय राज्यभरासाठी लागू असेल, असा अहवाल यापूर्वीच समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द होणार असल्याचे निश्चित झाले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यस्तरीय समितीने काही दिवसांत अंतिम अहवाल द्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यस्तरीय समिती आपला अहवाल 31 मेपर्यंत शासनाला देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT