भीमा कारखान्याने दिली शंभर टक्के एफआरपी! Sakal
सोलापूर

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! भीमा कारखान्याने दिली शंभर टक्के एफआरपी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! अखेर भीमा कारखान्याने दिली शंभर टक्के एफआरपी

राजकुमार शहा

एफआरपी पूर्ण केल्याबद्दल गावोगावी कारखान्याचे अध्यक्ष महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आभाराचे फलक लावले आहेत.

मोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने (Bhima Sugar Factory) थकीत असलेली 28 कोटींची एफआरपी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली असून, 25 ऑक्‍टोबरपासून सभासदांना दिवाळीसाठी (Diwali) प्रतिसभासद 25 किलो याप्रमाणे गटनिहाय साखर वाटप सुरू केली आहे. कामगारांनाही एक पगार बोनस म्हणून दिल्याने शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड झाली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. दरम्यान, एफआरपी पूर्ण केल्याबद्दल गावोगावी कारखान्याचे अध्यक्ष महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आभाराचे फलक लावले आहेत.

दोन वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती व दुष्काळ यामुळे सर्वच सहकारी साखर कारखाने अडचणीत आले आहेत. याला काही शासकीय धोरणांचाही कंगोरा आहे. गेल्या गाळप हंगामात कमी गाळप झाल्याने जास्तच अडचणी निर्माण झाल्या. परिणामी शेतकऱ्यांची उसाची बिले थकली. त्यामुळे साखर कारखान्याबरोबर शेतकरीही मोठ्या अडचणीत आला. शेतकऱ्यांना उसाची बिले मिळावीत म्हणून कार्यरत असलेल्या विविध शेतकरी संघटनांनी एफआरपी थकलेल्या कारखान्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली, तर आंदोलनेही केली. त्यात कारखान्यांच्या विरोधात असणाऱ्यांनीही संधी साधली. त्यामुळे कारखान्यासह प्रशासनाला बदनामीला सामोरे जावे लागले. तर शासनाच्या आरआरसीच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले.

दरम्यान, अध्यक्ष महाडिक यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वच साखर कारखान्यांची अडचणीची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी त्यावर विचार करून त्यातून सकारात्मक मार्ग काढला, त्यातूनच भीमाच्या एफआरपीचा मार्ग मोकळा झाला. दिवाळीच्या सणाला हातात पैसे आल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

कारखान्याचे एकूण नऊ गट असून पुळूज, टाकळी, तारापूर, अंकोली, पेनूर, कुरुल, इंचगाव, ब्रह्मपुरी व कामती झोन यांचा त्यात समावेश आहे. सभासदांना आर्थिक भुर्दंड नको म्हणून गटनिहाय साखर वाटप सुरू केले असल्याचेही कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT