अखेर शंकर साखर कारखाना सुरू
अखेर शंकर साखर कारखाना सुरू Sakal
सोलापूर

अखेर शंकर साखर कारखाना सुरू! बदलणार माळशिरस तालुक्‍यातील अर्थकारण

सुनील राऊत

काही कारणाने हा कारखाना आर्थिक अडचणीत येत गेला. 2015-16 ला शेवटचा गळीत हंगाम झाला.

नातेपुते (सोलापूर) : सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील (Shankarrao Mohite-Patil) यांनी सदाशिवनगर येथील चितळे यांचा खासगी कारखाना जो दिवाळखोरीत निघालेला होता, तो त्यांनी स्वतःची शेतजमीन गहाण ठेवून विकत घेऊन सहकारी तत्त्वावर सुरू केला. आणि माळशिरस तालुक्‍याचे नंदनवन करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. 1969-70 ला श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा (Shri Shankar Sugar Factory) पहिला गळीत हंगाम झाला. या कारखान्याची गाळप क्षमता 1250 मेट्रिक टन होती. पुढे ती लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते- पाटील (Pratapsinh Mohite-Patil) यांनी ती 2500 मे. टन गाळप क्षमता केली. आसवनी प्रकल्प सुरू केला. इथेनॉल प्रकल्प उभारला. यानंतर तत्कालीन अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील (Dr. Dhawalsinh Mohite-Patil) यांनीही वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला.

काही कारणाने हा कारखाना आर्थिक अडचणीत येत गेला. 2015-16 ला शेवटचा गळीत हंगाम झाला. तेव्हापासून हा कारखाना पाच वर्षे सलग बंद असल्यामुळे फक्त कामगारांचे नुकसान झाले असे नाही तर ऊस उत्पादकांनाही शेतातील उभा ऊस कोणत्या कारखान्याकडे पाठवायचा त्यासाठी कारखानदारांच्या दारोदारी फिरावे लागले. लगतच्या अनेक साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. सदाशिवनगरचा कारखाना फक्त सदाशिवनगरचा नसून या कारखान्यावर संपूर्ण माळशिरस तालुक्‍याचे अर्थकारण अवलंबून आहे. हा कारखाना बंद झाल्याने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या कारखान्यावर नव्याने संचालक मंडळ कार्यान्वित झाले; परंतु या कारखान्यावर असणारा 250 कोटींचा कर्जाचा बोजा, ऊस उत्पादकांची, व्यापारी देणी यासाठी कोणतीही बॅंक कर्ज देण्यास तयार नाही. विद्यमान अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने अनेक बॅंकांना कारखाना सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी मनधरणी केली; परंतु कागदोपत्री अडचणी असल्यामुळे कोणत्याही बॅंकेने कर्ज दिले नाही. सरतेशेवटी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या कौशल्याने कामगारांचे दहा टक्के आणि शेतकऱ्यांची एफआरपी 20 टक्के दिली आहे.

कारखान्यामध्ये अनेक तांत्रिक दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि गुरुवारी गुरू पुष्यामृत या मुहूर्तावर गळीत हंगामाचा प्रारंभ केला आहे. वास्तविक पाहता राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता संपूर्ण तालुक्‍याने या घटनेचे कौतुक केले, कारण हा कारखाना सुरू झाल्यामुळे तालुक्‍यातील 700 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 700 कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे. शिवाय पंचक्रोशीतील हॉटेल व्यावसायिक, पानटपरीचालक, पंक्‍चर काढणारी दुकाने, कापड, किराणा दुकाने आदी व्यवसायांना पुन्हा चालना मिळणार आहे. वार्षिक दोनशे कोटी रुपये या परिसरात येणार आहेत.

कारखाना सुरू होण्यापूर्वीच माळशिरस तालुक्‍यातील सुमारे चौदा हजार एकर ऊस गळितासाठी नोंदणी झालेला आहे. हा कारखाना सुरू झाल्यामुळे सदाशिवनगर, नातेपुते, शिंदेवाडी, धर्मपुरी, फोंडशिरस, माळशिरस आणि माण तालुक्‍यातही आर्थिक उलाढालीला वेग येणार आहे, हे मात्र निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT