logo 
सोलापूर

जुन्या विडी घरकुल परिसतील दोन महिला सावकारांच्या विरोधात गुन्हा 

प्रमोद बोडके

सोलापूर : पांडुरंग धोंडीबा लिंबोळे (वय 55, रा.रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या विडी घरकुलमधील प्लॅटिनियम आपार्टमेंटमधील सविता बगले यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बगले यांच्याकडे कुमार अण्णाराव ढंगापूरे यांच्या नावाचा शंभर रुपयांचा स्टॅम्प, अंबादास दत्तात्रय मादगुंडी यांच्या नावाचा शंभर रुपयांच्या स्टॅम्प, विजया बॅंकेच्या सोलापूर शाखेचा कोरा धनादेश (मागे सही असलेला), बॅंक ऑफ इंडियाच्या विजापूर रोड शाखेचा साठ हजार रुपयांचा धनादेश (शिवानंद अंबण्णा म्हेत्रे यांच्या खात्यावरील पे असलेला कोरा चेक) बगले यांच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सविता बगले यांनी लोकांकडून घेतलेले दोन कोरे धनादेश व दोन कोरे बॉण्ड या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. अधिकृत परवान्याशिवाय सावकारीचा व्यवसाय करत असल्याने बगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या घटनेत विवेकानंद बाबुराव स्वामी (वय 53, रा. नागेंद्रनगर, भाग एक - कुमठा नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हैदराबाद रोड वरील जुना विडी घरकुल येथील अंबिका नगरमधील सविता रमेश सरवदे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मनीष माने यांच्या नावे युको बॅंकेच्या जुळे सोलापूर शाखेतील बचत खात्याचे 5 चेक, मनीषा सुभाष माने यांनी लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या मुख्य शाखेत कर्ज मागणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचा मूळ प्रस्ताव, अंबादास दत्तात्रय मुदगुंडी यांच्या नावाचा शंभर रुपयांचा कोरा बॉण्ड ताब्यात घेण्यात आला आहे. सविता सरवदे यांनी लोकांकडून कोरे चेक बॉण्ड घेतले होते. या कारवाईत ते जप्त केले आहेत. अधिकृत परवानगीशिवाय सविता सरवदे यांचा सावकारीचा व्यवसाय असल्याने त्यांच्याविरोधातही महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 च्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT