fire sakal
सोलापूर

सोलापुरात ३ कारखान्यांना आग! ८५ लाखांचे नुकसान; भिंत तोडून काढला मार्ग, सर्वच बाजूने बंदिस्त बांधकाम, मदतीत अडथळा

अक्कलकोट रोड परिसरातील सुताचा कारखाना, प्लास्टिकचा कारखाना आणि साई सुपर मार्केटच्या गोडवानास आग लागून ८५ लाखाचा नुकसान झाले. हे तिन्ही कारखाना सर्वच बाजूंनी बंदिस्त असल्याने मदत कार्यात अडथळा आले. भिंत तोडून, पत्रे उचकटून अग्निशामक यंत्रणेला मार्ग काढावा लागला.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : अक्कलकोट रोड परिसरातील सुताचा कारखाना, प्लास्टिकचा कारखाना आणि साई सुपर मार्केटच्या गोडवानास आग लागून ८५ लाखाचा नुकसान झाले. हे तिन्ही कारखाना सर्वच बाजूंनी बंदिस्त असल्याने मदत कार्यात अडथळा आले. भिंत तोडून, पत्रे उचकटून अग्निशामक यंत्रणेला मार्ग काढावा लागला. ३५ वाहनाद्वारे तब्बल पाच तास आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशामक विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली.

अक्कलकोट रोड गांधीनगर येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास पुरुषोत्तम समारंभ यांच्या डब्लिंग सुताच्या समृद्धी डब्लिंग वर्क्सला कारखान्याला आग लागली. कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीचा भडका वाढू लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कारखाना मालकाला आणि अग्निशामक दलाला माहिती दिली.

दुपारी दीड वाजता अग्निशामक दलाची यंत्रणा आगीच्या ठिकाणी पोचली. परंतु; कारखाना चहूबाजूने बंदिस्त असल्याने मदत कार्यात अडथळा येऊ लागला. अखेर अग्निशामक यंत्रणेने दोनशे फुटाची पाइपलाईन करून भिंत पाडून, पत्रे उचकटून मार्ग काढत आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू ठेवला. यामध्ये वायडिंग मशिन, सुताचे पोते, पेपर कोन, कच्चा व पक्का माल जळून खाक झाले. त्यात ८० लाखाचे नुकसान झाले. तर हा भडका बाजूलाच असलेल्या शिवराज कांबळे यांच्या उन्नती ऍग्रो प्लास्टिक या कारखान्याकडे पसरले. यामध्ये कारखान्याच्या ऑफिस मधील टेबल खुर्च्या आदींचे नुकसान झाले.

तसेच याच कारखान्याच्या लगत असलेल्या विनोद बाहेती यांच्या साई सुपर मार्केटच्या गोडवानला आग लागून भुसार मालाचे नुकसान झाले. दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रणाचे काम सुरूच होते.

दोन कारखान्यांचे टळले नुकसान

संपूर्ण कारखाना बंदिस्त असल्याने मदत करायचे येत होते. आधीचा भडका अधिक मोठा असल्याने यंत्रणेसह इतर खासगी यंत्रणेची मदत घेऊन आग आटोक्यात आणल्याने इतर दोन कारखान्याचे नुकसान टळले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचे श्री. आवटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT