Firing from a dispute in Velapur in Malshiras taluka 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यातील वेळापुरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : वेळापूर (ता. माळशिरस) येथे पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना आज (सोमवारी) घडली. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अकलूज-सांगोला रोडवर डॉ. नाईक हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. याबाबत वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. 
वेळापूर पोलिसांनी दिलेली माहिती, अशी फिर्यादी भाऊसाहेब मच्छिंद्र मगर (वय 28, रा. निमगाव मगराचे, ता. माळशिरस) हे आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाईक हॉस्पिटलसमोर मेहुणा कृष्णराव सुभाष चव्हाण (वय 29) याच्याशी गप्पा मारत थांबले होते. यावेळी विमूल नामदेव पोरे (रा. वेळापूर) हा तेथे आला. विमूलने पूर्ववैमनस्यातून भाऊसाहेब मगर व कृष्णराव चव्हाण यांच्यावर गोळी झाडली. मात्र ते खाली वाकल्याने त्यांना गोळी लागली नाही. विपूल पोरे याने त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर विपूल पोरे हा पळून गेला. त्याच्यावर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT