first government to support of Terrorist Nawab Malik Praveen Darekar solapur sakal
सोलापूर

देशद्रोह्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे हे पहिलेच सरकार; प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांची टिका; अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आतंकवादी दाऊदशी संबंध असणारे मंत्री नवाब मलिक हेदेखील देशद्रोही आहेत. या देशद्रोही मंत्र्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे हे पहिलेच सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशभक्‍तीपेक्षा सत्तेची खुर्ची महत्त्वाची असल्याने त्यांचेही हात बांधले गेले असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

सोलापुरात हेरिटेज येथे मंगळवारी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. श्री. दरेकर म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोट घडवून शेकडोंचे बळी घेणारा आंतकवादी दाऊद इब्राहीम व त्याच्या टोळीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. या तपास यंत्रणेमध्ये दाऊदच्या टोळीने कुर्ला येथील तिनशे कोटी रुपयांचा भूखंड बळकाविल्याचा गुन्हा आढळला. या गुन्ह्यात नवाब मलिक यांचा सहभाग आढळला.

ईडीच्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारून नवाब मलिकांनी राजीनामा दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांना मंत्रिपदावरून काढले नाही. मलिक राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतली. राज्याचे मंत्रीमंडळ नवाब मलिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे हे पहिलेच सरकार ठरले. देशद्रोह्याला जातीय रंग देऊ नये. देशद्रोह्याला जात नसते. केवळ केंद्रावर, ईडीवर टिका करून चालणार नाही. देशद्रोह्यांसाठी पक्ष न पाहता कारवाईची गरज आहे, असेही श्री दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले...

  • केंद्रावर टिका करून नव्हे तर समन्वय साधून राज्याचा विकास केला पाहिजे

  • समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील गुरु- शिष्याचं नातं राज्यपाल कोश्‍यारी यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल कोश्‍यारी यांना आदर आहे

  • नवाब मलिकांचे समर्थन करणे म्हणजे दाऊद इब्राहीमचे समर्थन होय

  • अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके आडवी होत आहेत.पिके आडवी करणाऱ्यांना भाजप आडवं करेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT