For the first time in history Shree Swami Samarth Punyatthi Festival without devotees 
सोलापूर

इतिहासातील पहिलाच प्रसंग; भक्तांविना श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (जि. सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा 142 वा पुण्यतिथी सोहळा भाविकांविना आज संपन्न झाला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा कोरोनामुळे भाविकांची गर्दी टाळण्यासाठी रद्द करण्यात आले असून हा पुण्यतिथी महोत्सवाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. 
सध्या कोरोना संसर्गाची काळजी म्हणून शासन व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करत मंदिर समितीने ता. 17 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे. मात्र, मंदिरातील नित्यपूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पाश्वभूमीवर आज सोमवार पहाटे 5 वाजता श्रींची पुण्यतिथी महोत्सवाची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानंतर मंदिर समितीच्यावतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींना लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजता देवस्थानची नैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी 12 वाजता अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत पुरोहित मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले. यानंतर सायंकाळी शहरातून प्रतिवर्षी संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला. श्री स्वामी समर्थांचा 142 वा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे,विश्वस्त विलासराव फुटाणे, गणेश दिवाणजी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT