2vij_20bill 
सोलापूर

सांगोला उपविभागाच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी दीड कोटी थकीत वीजबिल वसूल !

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : थकीत वीजबिल वसुलीकरिता सांगोला तालुक्‍यात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "एक दिवस, एक उपविभाग' अंतर्गत धडक वसुली मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत तालुक्‍यातून एका दिवसात सुमारे एक कोटी 68 लाख रुपयांची थकीत वीजबिले वसूल करण्यात आली. 

गेल्या अनेक वर्षांपासून थकीत वीज बिलाच्या समस्येने महावितरणला ग्रासले आहे. त्यातच गेले वर्षभर कोरोना संसर्गामुळे थकीत वीज बिलामध्ये मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउन काळात आकारण्यात आलेल्या वीज बिलावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. यावरून राजकारणही तापले आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या वतीने "एक गाव - एक दिवस', "एक दिवस - एक उपकेंद्र', "एक दिवस - एक वाहिनी', "एक दिवस - एक उपविभाग' असे उपक्रम राबवून प्रयत्न केले जात आहेत. या संकल्पनेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन वीजबिल वसुलीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या उपक्रमांना यशही मिळते आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात सुरवात केली आहे. 

बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पंढरपूरचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, प्रभारी कार्यकारी अभियंता संजीवकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोल्याचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी तालुक्‍यात नुकतीच "एक दिवस - एक उपविभाग' ही मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत तालुक्‍यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचे थकीत वीजबिल वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर वीज तोडणी मोहीम राबविण्यात आली. थेट वरिष्ठ अधिकारी घर व परिसरात आल्याने ग्राहकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसामध्ये एक कोटी 68 लाख रुपयांची थकीत वीजबिले वसूल करण्यात आली आहे. सांगोला उपविभाग अंतर्गत एकाच दिवसात एवढी मोठी वीजबिल वसुली इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. या मोहिमेमध्ये उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांच्यासह सांगोला उपविभागमधील सर्व शाखा अभियंता, जनमित्र, यंत्रचालक, बिलिंग विभाग व वीजबिल भरणा केंद्र, सांगोला यांनी सहभाग घेतला होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Mangalwedha News : ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाकडे आहे त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये; माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Mumbai Crime : गर्दीच्या लोकलमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; २१ वर्षीय महिला जाळ्यात, ३.४३ लाखांचे दागिने जप्त

Pune News : विनानिविदा झाडणकामात घुसखोरीचा प्रयत्न; दोन ठेकेदारांना घुसविण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT