Karkamb 
सोलापूर

ग्रामस्थांनी अनुभवला भारतीय इतिहासातील पहिलाच सुना-सुना स्वातंत्र्यदिन

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब (सोलापूर) : अभ्राच्छादित आकाशाच्या वातावरणात रिमझिम पावसासह कोरोनाचे मळभ घेऊन आलेला या वर्षीचा स्वातंत्र्यदिन भारतीय इतिहासातील पहिलाच सुना-सुना स्वातंत्र्यदिन ठरला. 

दरवर्षी स्वांतत्र्यदिनी आसंमत दुमदुमून टाकत गावा-गावांमधून आणि शाळा-शाळांमधून घुमणारा "भारत माता की जय'चा नारा आज ऐकूच आला नाही. ना उत्साहाने ओतप्रोत भरलेले विद्यार्थी, ना प्रभात फेरी, ना देशप्रेमाची भारावून टाकणारी भाषणे, ना कवायत, ना नानाविध उपक्रम! असा कोणताच प्रेरणादाई कार्यक्रम न होता केवळ ध्वजवंदन करण्याची औपचारिकता पूर्ण करत आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. 

स्वातंत्र्यदिनी गावा-गावांमधून देशाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठीच्या अबालवृद्धांच्या उत्साहावर कोरोनाने यावर्षी विरझण टाकल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. स्वातंत्र्यदिन म्हटले, की विद्यार्थ्यांच्या आनंद आणि उत्साहाला उधाण आलेले असते. पण आजचा स्वातंत्र्यदिन मुलांचे "स्वातंत्र्य'च हिरावून घेत त्यांना घरातच स्थानबद्ध करणारा ठरला. गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरणात झाकोळलेल्या सूर्यनारायणाने आजच्या स्वातंत्र्यदिनीही दर्शन दिलेच नाही. उलट सकाळी सातपासूनच बरसणाऱ्या श्रावण सरींनी ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत केली. शाळांवर ध्वजवंदन करताना कोरोनासंबंधित खबरदारीचे सर्व नियम पाळून शिक्षक आणि शाळाव्यवस्थापन समितीला कमाल दहा जणांच्याच उपस्थितीत ध्वजाला वंदन करावे लागले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बोलावू नये अशा प्रशासनाच्या सूचना होत्या. त्यात भरीस भर म्हणजे सकाळी सातपासूनच संततधार पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना निसर्गानेच घरात "क्वारंटाइन' करून टाकले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांशिवाय आणि कोणत्याही सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांशिवाय साजरा झालेला आजचा स्वातंत्र्यदिन हा भारतीय इतिहासातील पहिला सुना-सुना स्वातंत्र्यदिन ठरला. 

पण अशाही परिस्थितीत सर्वच शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका, विविध सामाजिक संस्था आदी ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून संततधार पावसामध्ये ध्वजवंदन करण्यात आले. काही नागरिकांनी तर शाळा, कॉलेजमध्ये जाता येत नसल्याने आपल्या पाल्यांसह कुटुंबासमवेत घरावर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपल्या भारत मातेप्रति सद्‌भावना व्यक्त केल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

Career Growth Astrology: मिथुन राशीसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ! गुरुच्या भ्रमणामुळे आयुष्यात लाभ अन् मोठी संधी

SCROLL FOR NEXT