सोलापूर

सोलापूर महापालिका शाळांचे प्रवेशही आता "ऑनलाइन' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : डिजिटल युगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळानेही त्यानुसार पावले उचलण्यास सुरवात केली आहे. महापालिका शाळांचे प्रवेशही आता डिजिटल पद्धतीने ऑनलाइन केले जात आहेत. त्यासाठी गत जानेवारी महिन्यात केलेल्या सर्व्हेच्या वेळी नोंदविण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाची लिंक पाठवली जात आहे. 

जिल्हा परिषदांच्या शाळा "डिजिटल' व्हाव्यात यासाठी "सकाळ'ने विशेष उपक्रम राबविले. त्याचवेळी महापालिका शाळाही काळाच्या बरोबरीने चालाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचाच परिणाम होऊन अनेक संस्थांनी व व्यक्तींनी महापालिकेच्या शाळाही डिजिटल होण्यासाठी आपापला वाटा उचलला. शैक्षणिक स्पर्धेत महापालिकेच्या शाळा ताठ मानेने उभ्या राहाव्यात, यासाठी गुणवत्ता विकासाचा ध्यास विद्यमान शिक्षकांनी घेतला आणि शाळांचे स्वरूप बदलू लागले.

महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळा म्हटले की अनेकजण नाके मुरडतात. अपवाद वगळता याच शाळांमध्ये शिकून मोठ्या पदावर गेलेल्या आजच्या पालकांचाही त्यात 
समावेश असतो. आता या सरकारी शाळा आम्हीही काही कमी नाही हे दाखविण्यास सुरवात केली आहे. लॉकडाउनमध्ये खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांतही ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. पालक घरबसल्या मोबाईलवर पाल्यांची माहिती भरून प्रवेश निश्‍चित करत आहेत. हजारो रुपयांचे शुल्क भरू; पण पाल्यांना खासगी शाळेतच पाठवू, ही मानसिकता अद्याप पालकांत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय वस्त्यांमधील मुले महापालिका शाळेत यावीत, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. 

महापालिका शाळांची स्थिती 
- एकूण शाळा ः 64 
- माध्यम ः मराठी, कन्नड, तेलुगु आणि उर्दू 
- सर्व शिक्षण अभियानातून सर्व शाळांत ग्रंथालये 
- एक इंग्लिश स्कूल आणि काही शाळांत सेमी इंग्लिश स्कूल 
- सर्व शाळांना मोठी मैदाने, मात्र त्यांची दुरवस्था 
- खासगी शाळांशी मोठी स्पर्धा 
- गुणवत्ता असूनही प्रसिद्धीत मागे
- भौतिक सुविधांसाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद 

 आमच्या शाळेतील शिक्षकांनी जानेवारीत विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी नोंदविण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचा फायदा आता झाला असून, विद्यमान विद्यार्थ्यांसह नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रवेशाची लिंक पाठवली असून, त्याचबरोबर शाळेत मिळणाऱ्या सुविधांची माहितीही पीडीएफच्या माध्यमातून पाठवली आहे. 
- संगीता जाधव, मुख्याध्यापिका 

प्रशासनाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळेच्या परिसरातील नागरिकांनाही प्रवेशाबाबतची लिंक पाठवली आहे. पालकांनीही लिंक भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्‍चित करण्यास सुरवात केली आहे. 
- गणेश धनवटे, मुख्याध्यापक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT