Malegaon 
सोलापूर

पिंपरीच्या शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; सोयाबिन काढण्यासाठी मासेमारीच्या ट्यूबचा वापर 

शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : अतिवृष्टी झाली, शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सोयाबिन पाण्यात भिजले, काढणीला आलेल्या उडदाचा चिखल झाला. शेंगाला नवीन कोंब फुटले, पिके पाण्यात सडून पिकांचा वास सुटला. उभा असलेला ऊस भुईसपाट झाला, लागण केलेले कांदे पाण्याबरोबर वाहून गेले... ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे बार्शी तालुक्‍यातील मळेगाव, पिंपरी (सा), ढाळे पिंपळगाव, उपळे परिसरात. 

पिंपरी (सा) येथील शेतकरी पैगंबर शेख यांचे संपूर्ण शेत जलमय झाल्याने सोयाबिन पाण्यात भिजले आहे. हिंगणी तलावात मासेमारी करणाऱ्या फरीद शेख, पैगंबर शेख, कबीर शेख यांनी शेतात साचलेले पाणी पाहून सोयाबिन काढणीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. शेतात तळ्याचे स्वरूप आल्याने सोयबिन काढताना मासेमारीसाठी वापरले जाणारे ट्यूब वापरले. त्यामुळे गुडघाभर पाण्यात सोयाबिन काढणे सोपे झाले आहे. 

एकाच वेळी ट्यूबवर सोयाबिनचे काढ अधिक ठेवता येत असल्याने होणारा त्रास कमी झाला आहे. सोयाबिन सलग दहा ते बारा दिवस पाण्यात राहिल्याने त्याचा वास सुटून बुडाशी सडले आहे. शेतकऱ्यांनी डोळ्यात आलेले पाणी पुसत स्वतःला सावरत सोयाबिन काढणीला सुरुवात केली आहे. शेतकरी भिजलेले सोयाबिनचे काढ पाण्यातून काढत अधूनमधून पडणाऱ्या उन्हात सुकावतो आहे. 

परिसरातील पैगंबर शेख, सुधीर काशीद, फरीद शेख, किशोर काशीद, जयंत काशीद, लक्ष्मण काशीद, दशरथ काशीद, शिरीष काशीद, आमीन शेख, अर्जुन काशीद, हनुमंत काटमोरे, श्रीमंत गडसिंग, लालासाहेब काटमोरे, सौदागर वायकर, काकासाहेब काशीद, मारुती काशीद, नारायण काशीद, नानासाहेब काळे, सतीश काशीद, पिंटू कोळी, हनुमंत वायकर, सुनील वायकर, पोपट काटमोरे, मोहन वायकर यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबिन, उडीद, कांदा, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा भीषण परिस्थितीत देखील प्रशासन मात्र डोळ्यावर हात ठेवून शासकीय आदेशाची वाट पाहत बसले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून झालेली आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT