Fire 
सोलापूर

बिबट्याच्या शोधासाठी पाच एकर ऊस पेटवला, पण वनविभागाला चकवा देऊन बिबट्या पळाला ! 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : चिखलठाण (ता. करमाळा) येथे लांडा हिरा भागात बिबट्याने ऊसतोड कामगारांच्या आठ वर्षीय मुलीचा प्राण घेतला आहे. करमाळा तालुक्‍यातील सहा दिवसातील हा तिसरा बळी आहे. बिबट्याला पकडण्यासाठी किंवा बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तयारी सुरू केली असून, या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस व केळी पीक असल्याने बिबट्या चकवा देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उसात बिबट्या लपल्याचा अंदाज आहे, तो 5 एकर ऊस सायंकाळी साडेपाच वाजता पेटवून देण्यात आला; मात्र वन अधिकाऱ्यांसमोरूनच हा बिबट्या पळून गेला आहे. 

ऊसतोड कामगारांची मुलगी फुलाबाई हरिचंद कोटले (वय 8) ही मुलगी या हल्ल्यात मृत झाली आहे. सोमवारी (ता. 7) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. या घटनेची माहीती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिखलठाण येथे दाखल झाले. दुपारी 12 वाजल्यापासून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्याचा शोध घेतला. या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे या ठिकाणी दाखल झाले. 

पेटवून दिलेला पाच एकर ऊस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांचा आहे. उसाच्या तिन्ही बाजूने आग लावण्यात आली असून, एका बाजूला बिबट्याला पकडण्यासाठी वाघर लावण्यात आली आहे. उसाच्या चारही बाजूने शार्प शूटर तैनात होते. तरीही ऊस पेटवताच बाजूला असलेल्या केळीच्या पिकातून शेटफळ गावच्या दिशेने बिबट्या पसार झाला आहे. 

या वेळी सहाय्यक वन संरक्षक संजय कडू, सहाय्यक वन संरक्षक बाळासाहेब हाके यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय बिबट्याला बेशुद्ध करणारी तीन बेशुद्ध पथके तैनात होती. शिवाय ड्रोन कॅमेरे, बंदूकधारी कर्मचारी उपस्थित असतानाही बिबट्या पळाल्याने ग्रामस्थांमधून वन विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

बिबट्याला पकडण्याची चांगली संधी सुटली 
गेल्या सहा दिवसांपासून बिबट्याने करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घातला आहे. सहा दिवसांत तीन जणांचे बळी घेतले आहेत. सध्या बिबट्याचे वास्तव्य उजनी पट्ट्यात असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केळी व उसाचे पीक आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा शोध घेणे सोपे नाही. आज बिबट्या ज्या उसात होता, त्याच्या तिन्ही बाजूने ऊस तोडलेला आहे. तर एका बाजूला केळी आहे. त्याला पकडण्याची किंवा त्याला ठार करण्याची ही सुवर्णसंधी वन विभागाची हुकली आहे. बिबट्या पळाला म्हणताच उपस्थित पाचशे ते सहाशे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT