bibtya 
सोलापूर

वनविभाग ऍक्‍शन मोडवर ! बिबट्याला घेरून पकडण्यासाठी पाच एकर ऊस जाळणार 

अण्णा काळे

चिखलठाण (सोलापूर) : चिखलठाण (ता. करमाळा) येथे लांडगा हिरा भागात बिबट्याने ऊसतोड कामगारांच्या आठ वर्षीय मुलीचा प्राण घेतला आहे. करमाळा तालुक्‍यातील सहा दिवसांतील हा तिसरा बळी आहे. ऊसतोड कामगारांची मुलगी फुलाबाई कोटले (वय 8) ही मुलगी या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. आता वन विभाग ऍक्‍शन मोडवर आला असून, बिबट्याला घेरून पकडण्यासाठी तो लपलेला पाच एकर ऊस परिसर जाळण्यात येणार आहे. 

सोमवारी (ता. 7) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. ही घटना घडताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी किंवा बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून, या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस व केळी पीक असल्याने बिबट्या चकवा देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उसात बिबट्या लपला आहे, तो पाच एकर ऊस पेटवून देण्यात येणार आहे. हा ऊस राजेंद्र बारकुंड यांचा आहे. उसाच्या तिन्ही बाजूने आग लावली जाणार असून, एका बाजूला त्याला पकडण्यासाठी वाघर टाकण्यात आले आहे. याशिवाय तीन बेशुद्ध पथक तैनात असून वन विभागाचे 100 कर्मचारी उपस्थित आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : जीएसटी मध्ये मोठ्या बदलांची शक्यता; कर अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार जाणार? मोठ्या बदलांची चर्चा

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT