Five Corona patients in Solapur for using public toilets 
सोलापूर

धक्कादायक! सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्या पाच जणांना कोरोना

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पावधीतच 'रेड झोन'मध्ये दाखल झालेल्या सोलापुरात गुरुवारपर्यंत (ता. 7) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 182 झाली होती. सुरुवातीपासून आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री पोलिस, महापालिकेचे आरोग्य यंत्रणा शोधून काढत आहे. या रुग्णांपैकी काहींची ट्रॅव्हल हिस्ट्री तथा त्यांचे मोबाईल लोकेशन त्यांच्या घराच्या परिसरातच दाखवित आहे. तरीही त्यांना कोरोनाची लागण झालीच कशी, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे पाच रुग्ण सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
लॉकडाऊननंतर तब्बल 22 दिवस सोलापूर कोरोनापासून चार हात लांब होते. 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयातील नर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांची संख्या आणि शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वाढतच गेले. शहरातील हद्दवाढ भागातील तथा झोपडपट्ट्यांमधील नागरिक सार्वजनिक शौचालय याचा सर्वाधिक वापर करतात. वास्तविक पाहता ही सार्वजनिक शौचालये स्वच्छ असणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकाने ही सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता राखावी, असे महापालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार काही सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता होऊन त्या ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी ही करण्यात आली. मात्र, सद्यस्थिती वेगळीच असल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यात पुणे- मुंबई होऊन अनेक नागरिक लॉकडाऊनपूर्वी व लॉकडाऊननंतर दाखल झाले आहेत. त्यापैकी बहुतांश लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री, मर्यादित असतानाही त्यांना या विषाणूची बाधा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकाच कुटुंबातील चार-  पाचजण कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु, समाधानकारक बाब म्हणजे एका रुग्णाच्या संपर्कातील दुसऱ्या व तिसऱ्या व्यक्तींना ट्रेस करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले जाते. यासाठी स्वतंत्रपणे शीघ्र तपासणी पथकांची नियुक्ती केली असून त्यामाध्यमातून बहुतांश रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या पथकाच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 160 रुग्ण निष्पन्न झाले आहेत‌. जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही प्राथमिक लक्षणे असलेले लोक तपासणीसाठी समोर येत नसल्याने आता एकाच घरातील चार ते पाच व्यक्ती करून पॉझिटिव्ह निघू लागले आहेत. त्यामुळे लक्षणे असलेल्यांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. जेणेकरून आपले कुटुंब सुरक्षित राहील.
- डॉ. संजय नवले, आरोग्याधिकारी सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT