logo 
सोलापूर

स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्यासाठी वीजग्राहकांना पाच दिवसांची मुदत 

प्रमोद बोडके

सोलापूर : प्रत्येक महिन्याच्या निश्‍चित तारखेला महावितरणकडून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. मात्र ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्यासाठी पूर्वी 24 तासांची असलेली मुदत आता तब्बल पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्वतःहून रिडींग पाठविल्यास विविध फायद्यांसह बिलाची पडताळणी देखील वीजग्राहकांना शक्‍य होत आहे. ग्राहकांनी पाठविलेले रिडींग स्वीकारण्यात येत असल्याने महावितरण मोबाईल ऍप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे. 

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) सुरु करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्‍चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्‍चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या या निश्‍चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची एसएमएसद्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून पाच दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ऍप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल. पूर्वी केवळ मीटर रिडींग न होऊ शकल्याने ग्राहकांना मेसेज पाठविले जात होते व रिडींगसाठी 24 तासांची मुदत देण्यात येत होती. मात्र आता दरमहा रिडींग पाठविण्यासाठी तब्बल पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ग्राहकांनी मीटरचे केडब्लूएच रिडींग व त्यानुसार रिडींगचा फोटो पाठविल्यास महावितरणकडून घेण्यात आलेल्या रिडींगऐवजी ग्राहकांनी पाठविलेल्या रिडींगनुसार बिल तयार केले जात आहे. 

मीटर रिडींग पाठविण्यासाठी महावितरण मोबाईल ऍप डाऊनलोड करणे व महावितरणकडे मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी असणे आवश्‍यक आहे. महावितरण मोबाईल ऍपमध्ये सबमीट मीटर रिडींगवर क्‍लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्‍ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मन्यूअली रिडींग ऍपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल ऍपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT