01sugar_factory_4_0.jpg
01sugar_factory_4_0.jpg 
सोलापूर

पाच कारखान्यांनी कर्मचाऱ्यांना 'पीएफ' दिलाच नाही ! सव्वाचार कोटींची वसुली; 'आदिनाथ'ची 25 हजार क्‍विंटल साखर जप्त 

तात्या लांडगे

सोलापूर : कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम कपात करुनही कामगारांना ती रक्‍कम मिळत नसल्याच्या तक्रारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी सोलपूर, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील कारखाने, बॅंक, शैक्षणिक संस्थांकडून चार कोटी 14 लाख 39 हजार 543 रुपयांची रक्‍कम वसूल केले आहेत.

वसूल केलेली कारखानानिहाय रक्‍कम 

  • भीमा साखर कारखाना (मोहोळ) : एक कोटी सहा लाख 10 हजार 201 रुपये 
  • गोकुळ शुगर्स (धोत्री) : 89 लाख 47 हजार 877 
  • विठ्ठल सहकारी साखर कारखाना (पंढरपूर) : 87 लाख 35 हजार 731 
  • मकाई साखर कारखाना (करमाळा) : 33 लाख 45 हजार 971 
  • आदिनाथ साखर कारखाना (करमाळा) : 25 हजार क्‍विंटल साखर जप्त अन्‌ लिलाव 
  • सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी, उस्मानाबाद) : 11 लाख 54 हजार 381 

ई- पीएफ कायद्याअंतर्गत 2019 पर्यंतचा भविष्य निधी न भरल्यामुळे जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या विरोधात अर्ध न्यायिक चौकशी करण्यात आली. त्यात भीमा सहकारी साखर कारखाना, गोकूळ शुगर्स, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, मकाई साखर कारखाना, सीताराम महाराज साखर कारखान्याचा समावेश होता. या कारखान्यांकडून तीन कोटी 27 लाख 94 हजार 161 रुपये वसूल केल्याची माहिती डॉ. तिरपुडे यांनी दिली. तसेच शहर- जिल्ह्यातील 24 संस्था तथा कंपन्यांविरुध्द कारवाई करुन उर्वरित रक्‍कम वसूल केल्याचेही ते म्हणाले. सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी आरआरसी जाहीर केल्यानंतर या कारखान्यांची बॅंक खाती सील करून 86 लाख 45 हजार 382 रुपयांची रक्‍कम वसूल केली. भविष्य निधी कार्यालयाचे के. भानूप्रकाश आणि प्रतीक लाखोले यांनी ही कारवाई केली. त्यात महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक, लातूर, भैरवनाथ शुगर वर्क्‍स, वाशी (उस्मानाबाद), वर्धमान हायटेक ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स (मोहोळ), यशवंत महाविद्यालय, उदगीर (लातूर), भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, उमरगा (उस्मानाबाद) आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना (करमाळा) यांचा समावेश असल्याचेही तिरपुडे यांनी स्पष्ट केले. या कारखान्याकडे साडेसहा कोटींची रक्‍कम थकीत असून त्यासाठी कारखान्याकडील 25 हजार क्‍विंटल साखर जप्त केली असून त्याचा 5 फेब्रुवारीला लिलाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT