सोलापूर

ब्रेकिंग : देवदर्शनाला जात असताना वेळापूरजवळ अपघात; पाच ठार

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : वेळापूरजवळ शनिवारी (ता. १) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टॅंकर व कारचा अपघात झाला आहे. यामध्ये पाचजण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले सर्व वैराग (ता. बार्शी) येथील आहेत.  वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.  
वेळापूरजवळ पुणे- पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टॅंकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. कार पुण्याहून वैरागकडे येत असताना हा अपघात झाला. अपाघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गाडीत आठजण होते. त्यातील पाच जण ठार झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्याच्यावर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी वेळापूर पोलिस दाखल झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: नववर्षाच्या जल्लोषासाठी मुंबई लोकल सज्ज! मध्यरात्री धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Year End 2025: भारत-पाकिस्तान हस्तांदोलन प्रकरण ते स्मृती मानधनाच्या आयुष्यात आलेलं वादळ; या वर्षातील ५ चर्चेत राहिलेल्या घटना

Latest Marathi News Live Update : 827 भारतीय लष्कराकडून इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सच्या वापराबाबत धोरण जारी

Sangli Election : भाजप-शिवसेना सोबत येणार, पण खाडे–वनखंडे संघर्षामुळे मिरजचा तिढा कायम

Kolhapur Crime : लोंबकळणारा मृतदेह पाहून 'ती' घरी आली, नंतर लोकांनी सांगितलं 'तुझ्याच पोरानं घेतलाय गळफास...' आईला कळताचं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT