Lockdown
Lockdown Media Gallery
सोलापूर

14.68 कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला !

तात्या लांडगे

6 जुलै 2020 ते 29 मे 2021 या काळात शहर-जिल्ह्यातील तब्बल पाच लाख बेशिस्तांकडून पोलिसांनी 14 कोटी 68 लाखांचा दंड वसूल केला आहे.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) पहिली लाट आणि दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांच्या आदेशाची पोलिसांच्या (Police) माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तरीही बेशिस्तांनी नियम पाळलाच नाही. 6 जुलै 2020 ते 29 मे 2021 या काळात शहर-जिल्ह्यातील तब्बल पाच लाख बेशिस्तांकडून पोलिसांनी 14 कोटी 68 लाखांचा दंड वसूल केला आहे. (Five lakh people in Solapur district violated corona restrictions)

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा, सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) पालन करावे, विनाकारण घराबाहेर फिरू नये असे साधे नियम पाळण्याचे आवाहन सर्वांनीच केले. मात्र, कोरोना बकवास आहे, आम्हाला कोरोना होत नाही असे म्हणत अनेकांनी बिनधास्तपणे नियम मोडले. अशा बेशिस्तांवर पोलिसांनी वॉच ठेवून दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला; जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, हा त्यामागचा हेतू होता. तर काही ठिकाणी पोलिसांनी दंडेलशाहीनेही दंड वसूल केल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत आल्या. तरीही पोलिसांनी कारवाईच्या माध्यमातून बेशिस्तांना शिस्तीचे धडे दिले आणि त्यामुळे कोरोना कमी होण्यास मदत झाली. शहरात सर्वाधिक बेशिस्तपणाचे दर्शन वाहनचालकांनी घडविले तर ग्रामीण भागात मास्कविना फिरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. (Five lakh people in Solapur district violated corona restrictions)

"या' गोष्टींसाठी होतेय कारवाई

मास्क न वापरणे, दुचाकीवर दोघा- तिघांनी प्रवास करणे, तीनचाकी वाहनात तीनपेक्षा अधिक तर चारचाकीत तीन अथवा चारपेक्षा अधिक प्रवासी, वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणे, दुकानात 60 वर्षांवरील व्यक्‍ती असणे, दुकानात अथवा दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती, होम क्‍वारंटाईन (Home quarantine) असतानाही नियम पाळत नाहीत, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, दुकानदार, व्यावसायिक, किरकोळ विक्रेत्यांकडे मास्क नाही, मंगल कार्यालयात दोन तासांपेक्षा अधिक काळ कार्यक्रम सुरू ठेवणे आणि त्या ठिकाणी 25 पेक्षा अधिक व्यक्‍ती असणे, आंतरजिल्हा नियमांचे उल्लंघन करणे, खासगी वाहनातून 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे अशा गोष्टींसाठी पोलिसांकडून कोरोना काळात कारवाई करण्यात आली आहे.

दंडात्मक कारवाईची स्थिती (कोरोनाची पहिली व दुसरी लाट)

(शहरातील कारवाई)

  • विनामास्क फिरणारे : 43,425

  • दंडाची रक्‍कम : 1.24 कोटी

  • नियम मोडणारे वाहनचालक : 1,89, 843

  • दंडाची रक्‍कम : 5.89 कोटी

  • अंदाजित एकूण दंड : 8.15 कोटी

(ग्रामीणमधील कारवाई)

  • विनामास्क फिरणारे : 1,83,298

  • दंडाची रक्‍कम : 4.79 कोटी

  • नियम मोडणारी वाहने : 9,383

  • दंडाची रक्‍कम : 41.28 लाख

  • एकूण वसूल दंड : 6.53 कोटी

कोरोना वाढणार नाही याची दक्षता घेत असतानाच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्‍ती व वाहनांवर वॉच ठेवणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन दररोज किमान दोन ते चार तासांची नाकाबंदी करून बेशिस्तांवर कारवाई केली. अजूनही तशीच कारवाई सुरू ठेवली आहे.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT