Counting of votes tomorrow sakal
सोलापूर

सोलापूर : पाच नगरपंचायतींसाठीआज होणार मतदाऩ

१२ हजार २०२ मतदाराकरीत १३ मतदार केंद्र सज्ज करण्यात आली आहेत.

तेजस भागवत

१२ हजार २०२ मतदाराकरीत १३ मतदार केंद्र सज्ज करण्यात आली आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेली माढा व माळशिरस तर नव्याने निर्माण झालेली महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतीसाठी उद्या (ता. २१) मतदान होणार आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती मिळाल्याने ओबीसी प्रभागातील निवडणुकही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. या पाच नगरपंचायतीमध्ये महाळूंग-श्रीपूरमध्ये भाजप-राष्ट्रवादी, अशी सरळ लढत लागली असून १३ जागांसाठी ८३ उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. १२ हजार २०२ मतदाराकरीत १३ मतदार केंद्र सज्ज करण्यात आली आहेत.

नातेपुते नगरपंचायती निवडणूक स्थानिक आघाडीवर होत असून येथे १३ जागासाठी ५४ उमेदवार रिंगणात आहेत. वैराग येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत असून १३ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. वैराग नगरपंचायातीकरीता ११ हजार १०७ मतदार असून १३ मतदार केंद्र आहेत. माढा नगरपंचायतीत १३ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत.माळशिरसमध्ये १३ प्रभागात ४५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. माढा शहरात एकूण ७ हजार २३३ मतदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT