Five people killed and 5 injured in accident on Mohol Pandharpur Palkhi route  Sakal
सोलापूर

मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावर अपघात पाच जणांचा मृत्यू अन्य पाच जण जखमी

भरधाव निघालेली इको कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पुलाला धडकून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.

राजकुमार शहा

Mohol News : भरधाव निघालेली इको कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पुलाला धडकून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. हा अपघात मोहोळ- पंढरपूर पालखी मार्गावरील पोखरापूर शिवारात मंगळवार ता 7 रोजी पहाटे अडीच वाजता झाला.

सोमनाथ शिवाजी डवरी वय 40, रेणुका सुरेश कासार वय 45, नवनाथ अनिकेत जाधव वय 7 हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप हरिनाथ कोष्टी वय 60, सीता दिलीप कोष्टी वय 55, हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

श्रावणी सुरेश डवरी वय 16, महेश दिलीप कोष्टी वय 24, निकिता महेश कोष्टी वय 19, आकाश सुरेश जोगी वय 21 रा वडाळा, अश्विनी अनिकेत जाधव वय 25 रा कोर्टी अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, इको कार क्रमांक एम एच 13 इसी 2819 ही कोल्हापूर हून पंढरपूर मार्गे सोलापूरच्या दिशेने भरधाव निघाली होती. ती पोखरापुर शिवारात येताच तिच्यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती एका सिमेंट पुलाला धडकली.

त्यात वरील पाच जण मृत पावले, तर अन्य पाच जण जखमी झाले. हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी कार मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघाताची फिर्याद सुरेश शिवाजी डवरी वय 41 रा वडाळा तालुका उत्तर सोलापूर याने मोहोळ पोलिसात दिली असून इको कारचा चालक अनिकेत अंकुश जाधव वय 29 रा कोर्टी याचे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT