Five rickshaws in Solapur city for medical care 
सोलापूर

वैद्यकीय सेवेसाठी सोलापूर शहरात पाच रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
  • ठळक बाबी... 
  • सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असल्याने रुग्णांना उपचार तथा तपासणीसाठी जाण्यास अडचणी 
  • गुरूवारपर्यंत (ता. 23 ) शहरात कडेकोट संचारबंदी ; मेडिकल, हॉस्पिटलशिवाय सर्व आस्थापना बंद 
  • खासगी वाहन रस्त्यांवर विनाकारण फिरणार नाही याचे पोलिसांकडून नियोजन 
  • रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने केली पाच रिक्षांची सोय 
  • कॉल करून रुग्णांना जाता येईल रुग्णालयात ; प्रत्येकाची नोंद ठेवणे रिक्षा चालकासाठी बंधनकारक 


सोलापूर : संपूर्ण संचारबंदीत गुरुवारपर्यंत शहरातील मेडिकल्स, हॉस्पिटल वगळता अन्य सर्व दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये, बॅंका बंद राहणार आहेत. या काळात शहरातील नागरिकांना रुग्णालयात जाण्याची सोय व्हावी म्हणून पोलिस आयुक्तालयाने पाच रिक्षाची सोय केली असून उपायुक्त वैशाली कडूकर यांनी तसे आदेश काढले. 

शहारातील कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या चिंता वाढविणारी असून आता 'सारी' या आजारानेही सोलापुरात एन्ट्री केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गुरूवारपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तत्पूर्वी, शहर पोलिसांनी आतापर्यंत एक हजार 794 गुन्हे दाखल केले आहेत. तर नऊ हजार 390 जणांविरुध्द मोटार वाहन कायदयानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदयाचे उल्लंघन प्रकरणी एक हजार 44 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दोन हजार 675 दुचाकी, 173 रिक्षा आणि 37 चारचाकी जप्त केल्या आहेत. पुढील तीन विनाकारण खासगी वाहने रस्त्यांवर दिसणार नाहीत, यासाठी जागोजागी पोलिस बंदोबस्त लावला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी दिली. रिक्षातून प्रवास केलेल्या रुग्णांची माहिती लिखित स्वरुपात ठेवणे रिक्षा चालकांना बंधनकारक केले आहे. 

----- 
रुग्णांनी या रिक्षा चालकांना करावा संपर्क 
- समाधान साबळे (मो.क्र.9657058013) 
- अखिल शेख (मो.क्र. 8668701025 ) 
- शिवाजी भालेकर (मो.क्र. 7038381113) 
- शिवाजी साबळे (मो.क्र.8805941612) 
- नितीन साळूखे (मो.क्र.9175808480) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

'सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत'; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT