Vitthal Decoration 
सोलापूर

विठुरायाच्या शाही विवाह सोहळ्याच्या सजावटीसाठी मलेशिया, हॉलंड येथून आली फुले ! 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : आज (मंगळवार) वसंत पंचमी... आज दुपारी 12 वाजताच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रुक्‍मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर विविध आकर्षक फुलांनी सजवले आहे. यंदाच्या साजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे, या वर्षी मलेशिया आणि हॉलंड या देशांमधून ऍथोलियम, आर्किड, ट्युलिप व स्ट्रॉबेरी रोज अशी वेगवेगळी रंगबिरंगी फुले सजावटीसाठी आणली आहेत. 

पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी ही आकर्षक फुलांची सजावट केली आहे. यामध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, आष्टर, मोगरा, गुलछडी, बिजली, जरबेरा, कार्निशेन, घोडा पत्ता, सीता वेल, ग्लॅडिओ अशा विविध 26 प्रकारच्या चार टन फुलांनी देवाच्या गाभाऱ्यासह मंदिर आणि सभामंडप सजवण्यात आला आहे. नामदेव पायरी जवळही फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

दरवर्षी देवाचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावून देवाचा शाही विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवतात. परंतु, या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने मोजक्‍याच भाविक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत देवाचा विवाह सोहळा साजरा होत आहे. 
या विवाह सोहळ्याची जय्यत करण्यात आली. 

वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला पांढरा पोषाख परिधान केला जातो. आज देवाला पांढऱ्या शुभ्र रंगाचा पोषाख परिधान करण्यात आला आहे. तर रुक्‍मिणी मातेलाही पांढऱ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अनुराधा शेटे यांच्या अमृत वाणीतून रुक्‍मिणी स्वयंवर कथेचे निरुपणही होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT