hipprga dam 
सोलापूर

"सकाळ'चा पाठपुरावा : "डीपीसी'मधून सुरु करा हिप्परगा तलावाचे सुशोभिकरण 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरनजिकच्या ब्रिटिशकालिन हिप्परगा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तत्काळ सुरु करा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तलावाशेजारी बाग, पक्षी निरीक्षण केंद्र यासह इतर कामांसाठी आवश्‍यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल अशी माहिती पालमंत्री भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

हिप्परगा येथील तलावाचे संवर्धन व्हावे, पर्यटनाच्या अंगाने या तलावाचा विकास व्हावा यासाठी सकाळच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. "सकाळ'च्या पुढाकारातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, डॉ. व्यंकटेश मेतन यांच्यासह पक्षी प्रेमींनी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या तलावाला भेट दिली होती. येथील उपलब्ध साधनांची पाहणी करुन या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी कोण कोणती कामे करता येतील? याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. "सकाळ'ने केलेल्या या पाठपुराव्याची दखल पालकमंत्री भरणे व जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली असून हिप्परगा तलावाच्या सुशोभिकरणासाठी आवश्‍यक असलेल्या कामांना तत्काळ प्रारंभ करण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. 

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरच्या पुढील दौऱ्यात आपण हिप्परगा तलावाची व परिसराची पाहणी करणार आहोत. पंढरपुरातून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी व सोलापुरातील नागरिकांसाठी या तलावाच्या माध्यमातून नवीन पर्यटन केंद्र उपलब्ध होणार आहे. तेथील स्थानिकांनाही या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT