Milk 
सोलापूर

कासेगावात दूध भेसळ ! अन्न प्रशासनाने केले हजारो रुपयांचे दूध नष्ट; बेकायदेशीर डेअरी सील 

प्रमोद बोडके

सोलापूर : शेगाव (ता. जत, जि. सांगली) येथून कासेगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे येणाऱ्या भेसळयुक्त दुधावर सोलापूरच्या अन्न प्रशासनाने बुधवारी (ता. 3) कारवाई केली. या कारवाईत कासेगावातील डेअरी बेकायदेशीर असल्याचेही समोर आल्याने ही डेअरी सील करण्यात आली आहे. या कारवाईत 76 हजार 400 रुपयांचे भेसळयुक्त दूध नष्ट केल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी दिली. 

आयशर टेम्पोमधून एमएच 09 सीयू 0007 भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना मिळाली. या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मे. साबरकांथा को - ऑप. मिल्क प्रोड्यूसर लि. या पेढीची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कारवाईत म्हशीचे 1 हजार 980 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. संशयित भेसळीच्या दोन्ही दुधांचे नमुने विश्‍लेषणासाठी घेण्यात आले आहेत. 

मे. साबरकांथा को-ऑप मिल्क प्रोड्यूसर लि. मध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्‍यक तंत्रज्ञ नसल्याचे समोर आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांच्या सोबत सहाय्यक आयुक्त प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा; अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार असल्याचा इशारा पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Jalgaon News : जळगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला युद्धाची झळ! कच्चा माल मिळेना, उत्पादन निम्म्यावर आल्याने उद्योजक चिंतेत

२३ वर्षे डावललं! ‘टॉस, प्रेझेंटेशनमधून मला बाजूला ठेवलं’; रवी शास्त्री याचं नाव घेऊन माजी खेळाडूचा संताप

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

Ardhapur News : अर्धापूरात गारपीट-वादळी वाऱ्याचा तडाखा; ८ गावांतील २५० हेक्टर शेती बाधित, प्रशासनाची पाहणी

SCROLL FOR NEXT