father luis demello.jpg 
सोलापूर

शेकडो कुटुंबाना अन्नधान्य व निवाऱ्याची मदतः फादर लुईस डिमेलो यांचे कार्य 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः विद्यार्थ्यांची मानसिक विकास, संकटात सापडलेल्या व्यक्ती व कुटुंबाचे समुपदेशन व मदतीचे काम येथील फादर लुईस डिमेलो यांनी मागील काही दशकापासून केले आहे. अध्यापनाला समाजसेवेची जोड देताना संवाद व समुपदेशनाद्वारे शेकडो कुटुंबांना व व्यक्तींना त्यांनी केलेली मदत आगळ्या प्रकारची आहे. कोरोना संकटात शेकडो कुटुंबाना अन्नधान्याची व निवाऱ्याची मदत त्यांनी केली. 

फादर लुईस डिमेलो हे येथील निष्कलंक मरिया माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापन क्षेत्रात काही दशके प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. सोलापूरसह पुणे, सावंतवाडी, हरीगाव येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले. विशेष फेलोशिप घेऊन अमेरिकेत जाऊन समुपदेशनाचे शिक्षण घेतले. 
विद्यार्थ्यांची संवेदना समजून घेत त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयोग केले. जेव्हा मुले इतरांचे दुःख पाहतात तेव्हा त्यांच्या अपेक्षाच्या बद्दल संतुलीत दृष्टीकोन मिळवता येतो हे त्यांनी प्रयोगातून मांडलेल. 
त्यांनी शेकडो कुटुंबे व व्यक्तींना समुपदेशनाचे काम आजही सुरु ठेवले आहे. प्रत्येक आठवड्यात सात ते आठ कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांचे प्रश्‍न सोडवतात. समुपदेशन म्हणजे लोकांच्या मनाचे अंतरंग समजून घेत त्यावर सदसद्विवेक बुध्दीने प्रश्‍न सोडवण्याचे काम करता येते हा त्यांचा अनुभव आहे. अनेक संकटग्रस्त कुटुंबांना एकत्र जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी ते मनन, चिंतन व प्रार्थना याचा आधार महत्वाचा मानतात. 
कोरोना संकटात एकूम 267 कुटुंबांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. तसेच चर्चच्या परिसरातील एक सभागृह या कालावधीमध्ये परप्रांतीय कामगारांच्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रकारची सामाजिक कामे करत असताना सर्व धर्मियांशी त्यांनी सातत्याने ठेवलेला सकारात्मक संवाद देखील तेवढाच प्रभावी ठरतो.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT