Charnukaka Patil 
सोलापूर

दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे निधन 

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर) : मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत चेअरमन (स्व.) कि. रा. मर्दा व (स्व.) रतनचंद शहा या दोघांमध्ये समन्वय करून तालुक्‍यामध्ये असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दामाजी कारखान्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे श्री संत दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे गुरुवारी (ता. 27) पहाटे दोन वाजता सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

चरणूकाका पाटील हे ब्रह्मपुरी येथील शेतकरी कुटुंबातील असून साधी राहणी व उच विचारसरणी या उक्तीप्रमाणे माणसातला माणूस ओळखून प्रसंगावधान पाहून ते रंजल्या गांजलेल्यांना मदत करत होते. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श ठेवून 71 माणसांच्या कुटुंबाचा संसार सांभाळत होते. तसेच गावातील कुठल्याही जातिधर्माच्या लोकांचे सुख-दुःख असो प्रथमतः त्यांच्या कुटुंबात सहभागी होत होते. 

तालुक्‍यातील भीमा नदीकाठी असणाऱ्या ऊस उत्पादकांना सुरवातीच्या काळात भीमा व इतर कारखान्यांना ऊस आतापर्यंत न्यावा लागत असे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना तालुक्‍यातील कारखान्याच्या रूपाने शेतकऱ्यांचा राजवाडा व्हावा, ही संकल्पना सोबत घेऊन कि. रा. मर्दा व रतनचंद शहा त्यांच्या मदतीने कारखाना स्थापन करण्यामध्ये चरणूकाकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कारखान्यामध्ये काम करत असताना काटकसरीचा कारभार हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी पंढरपूरच्या (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून कारखान्याचा गाडा केला व कामगार आणि शेतकऱ्यांचे हित साधले. भीमा साखर कारखान्याचेही 15 संचालक होते. 

दामाजी साखर कारखान्यामध्ये त्यांनी संचालकपद, व्हा. चेअरमन, चेअरमन ही सर्व पदे यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेत कारखान्याचा कारभार पाहिला. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी त्यांची आस्था होती. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT