वादग्रस्त विधानाने अडगळीतील ढोबळे पुन्हा चर्चेत ! सुशीलकुमार शिंदे म्हणाले... Canva
सोलापूर

वादग्रस्त विधानाने अडगळीतील ढोबळे पुन्हा चर्चेत ! शिंदे म्हणाले...

वादग्रस्त विधानाने अडगळीतील ढोबळे पुन्हा चर्चेत ! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

तात्या लांडगे

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अडगळीत पडलेले ढोबळे या वक्‍तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

सोलापूर : मुलीच्या मंत्रिपदाला अडथळा होईल म्हणून कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde, Solapur) यांनीच सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांना निवडणुकीत पाडले. आपला विरोधातील उमेदवार कोण असावा, हेही शिंदेच ठरवत होते, असा आरोप भाजप नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhobale) यांनी रविवारी (ता. 1) एका कार्यक्रमात केला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अडगळीत पडलेले ढोबळे या वक्‍तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पाथरुट चौकातील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ढोबळेंनी कॉंग्रेसवर विशेषत: सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी, त्यांना एवढे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी, "कॉंग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात' या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी भाजप व भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार घेत ढोबळे म्हणाले, "ताई, तुम्ही एकदा शहर मध्य सोडून शहर उत्तरमध्ये निवडणूक लढवा, एकदा होऊन जाऊ द्या'. "शहराच्या पाणी प्रश्‍नावर कॉंग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही, आम्ही दुहेरी पाइपलाइन करून दाखवू', असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले. त्यावर कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्यावर जोरदार टीका केली.

लक्ष्मण ढोबळे यांची ताकद भाजपला माहिती असून त्यांना पक्षात कोणीच किंमत देत नाही. त्यामुळे ते वारंवार अशा प्रकारचे वक्‍तव्य करून चर्चेत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बेताल वक्‍तव्यापेक्षा त्यांनी विकासावर बोलावे. त्यांनी शहरात ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे.

- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, सोलापूर

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मुलाप्रमाणे मानतात. ज्या पक्षाने लक्ष्मण ढोबळेंना मोठे केले, त्या पक्षाला सोडून पक्षांतर करणाऱ्या ढोबळेंना लोक चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून शहराकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. चापलुसगिरी करणाऱ्या ढोबळेंना हे बोलणे शोभत नाही.

- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, कॉंग्रेस, सोलापूर

निवडणुकीनंतर लक्ष्मण ढोबळेंनी आताच हे वक्‍तव्य का केले, हा संशोधनाचा भाग आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीच कोणाबद्दल द्वेष ठेवला नाही. शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच दुहेरी पाइपलाइन होत असल्याचे ढोबळेंनी विसरू नये.

- ऍड. यू. एन. बेरिया, ज्येष्ठ नगरसेवक, कॉंग्रेस

सोलापूर स्मार्ट सिटीत येण्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे योगदान सोलापूरकरांना माहिती आहे. कॉंग्रसने पहिलीच बैठक शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात घेतली. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी हे वक्‍तव्य केले.

- संजय हेमगड्डी, माजी महापौर, कॉंग्रेस

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सर्वांना कुटुंबाप्रमाणेच समजतात. आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वांनीच प्रचारसभा घेतल्या होत्या. निवडणुकीला दोन-अडीच झाल्यानंतर लक्ष्मण ढोबळे यांनी आता हे वक्‍तव्य चर्चेत राहण्यासाठी केले आहे. कॉंग्रेसची ताकद आगामी निवडणुकीत निश्‍चितपणे विरोधकांना समजेल.

- सुदीप चाकोते, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस सेवादल यंग ब्रिगेड

तो वाढपी कोण, याची उत्सुकता

स्मार्ट सिटीच्या कामात नुसता भ्रष्टाचार सुरू असून कंत्राटदारांना जोपासण्याचे काम भाजप सत्ताधाऱ्यांनी केले. शहराचे प्रश्‍न सोडविलेच नाहीत, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. तसेच घराघरात नियमित पाणी देतो म्हणून भाजप सत्तेवर आला, परंतु त्यांनी घराघरात महागाई पोचविली. आम्ही पाणी आणून दाखवू, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यावर ढोबळे म्हणाले, ताई आम्ही पाइपलाइन करून दाखवू, तुम्ही फक्त वाढपी बदला. आता तो वाढपी महापालिकेतील कॉंग्रेसचा नेता की स्मार्ट सिटीतील अधिकारी, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT