सोलापूर

माजी मंत्री ढोबळे म्हणाले, जयंत पाटील यांच्या दारावरून गेलो तरी डायबेटिस होतो

मोहोळ तालुक्यातील वीज तोडणी विरोधात भाजपने शेतकर्‍यांसोबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

तात्या लांडगे

मोहोळ तालुक्यातील वीज तोडणी विरोधात भाजपने शेतकर्‍यांसोबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

सोलापूर : सूरज जाधव या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे सभागृहात राजकारण न करता आमदार यशवंत माने हे तालुक्यातील राज्यातील वीज तोडणी थांबवू शकले असते. पण, ते तसे करू शकले नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) खूप गोड बोलतात. त्यांच्या घरासमोरून जरी कोणी गेले तर त्याला सुद्धा डायबेटिस होतो, अशी टीका माजी मंत्री भाजप नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी केली. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे हे सरकार आज शेतकरी अडचणीत आला असून तो आत्महत्या करतोय, तरीही वीज तोडणी थांबवू शकत नसल्याचा समाचार त्यांनी यावेळी घेतला.

मोहोळ तालुक्यातील वीज तोडणी विरोधात भाजपने शेतकर्‍यांसोबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे, सुशील क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी ढोबळे यांनी आमदार यशवंत माने यांच्यासह माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. पाच राज्यातील निवडणूक निकालाबाबत सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले.

हात जोडून आता निवेदन, पुन्हा टेबल पालथा करू

तालुक्यातील शेतकरी अडचणीत असतानाही महावितरणकडून शेतीपंपाची वीज तोडली जात आहे. या सरकारला शेतकर्‍यांचे काहीच देणेघेणे नाही. आता आम्ही फक्त हात जोडून विनंती करून निवेदन देत आहोत. तरीही, कारवाई न थांबल्यास टेबल पालथा करू, असा इशारा माजी मंत्री ढोबळे यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT