आठवणी आबासाहेबांच्या! लाकडी टेबल-खुर्ची, फरशीवर अंथरलेली ती सतरंजी
आठवणी आबासाहेबांच्या! लाकडी टेबल-खुर्ची, फरशीवर अंथरलेली ती सतरंजी Canva
सोलापूर

आठवणी आबासाहेबांच्या! लाकडी टेबल-खुर्ची, फरशीवर अंथरलेली ती सतरंजी

दत्तात्रय खंडागळे

ज्यांनी आयुष्यभर राजकारण हे फक्त समाजकारण म्हणूनच केले, अकरा वेळा आमदार राहून सुद्धा घरामध्ये लाकडी बाकडे व खुर्च्या बदललेल्या नाहीत.

सांगोला (सोलापूर) : "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या विचाराचा राजकारणात बहुतांश वेळा वापर होतच नाही. परंतु, या विचाराचा, तत्त्वाचा आयुष्यभर अवलंब केलेले माजी आमदार कै. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) एकमेव होते, असेच म्हणावे लागेल. आपल्या सांगोला शहरातील (Sangola, District Solapur) घरात लाकडी टेबल- खुर्च्या, लाकडी बाकडे, घरातील जुनी शहाबादी फरशी, त्यावर अंथरलेली सतरंजी ही बैठक व्यवस्था सर्वसामान्य, राजकारणातील (Political) इतर मोठी नेतेमंडळी किंबहुना मंत्री आले तरीही शेवटपर्यंत तशीच राहिली. त्या लाकडी खुर्चीवर आबासाहेब बसून आजही आमच्याशी बोलत आहेत, अशीच भावना आमची होते, असे आज त्यांच्या कुटुंबीयांशी भेटायला आलेले सामान्य नागरिक आवर्जून सांगतात.

आपल्याकडील लोकशाहीत राजकारण म्हणजे समाजकारण असेच म्हटले जाते; परंतु राजकारणामध्ये समाजकारणापेक्षा स्वहित जपणारे आज आपल्याला राजकीय क्षेत्रात सर्वत्र दिसून येतात. गावचा सरपंच झाला तरी आपल्या घराला तशी पाटी लावणारे, गाडीवर तसे नावे लिहिणारे, त्यांचे बदललेले राहणीमान आपल्याला जाणवते. परंतु, ज्यांनी आयुष्यभर राजकारण हे फक्त समाजकारण म्हणूनच केले, अकरा वेळा आमदार राहून सुद्धा घरामध्ये लाकडी बाकडे व खुर्च्या बदललेल्या नाहीत. शहाबादी फरशीवर सतरंजी टाकून कार्यकर्त्यांशी बोलणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे राजकारणातील एकमेव व्यक्ती म्हणून आबासाहेब कायमच आठवणीत राहतील. आपल्या निवासस्थानामध्येच कार्यकर्त्यांचा व त्यांचा संपर्क होत होता. त्यांच्या घरातील त्या लाकडी टेबल- खुर्च्या पाहिल्या की त्यांच्या साधेपणाची जाणीव होते.

"आबासाहेब इज ग्रेट !'

तालुक्‍यातील मुख्य एका रस्त्याच्या कामाबाबत व त्या शेजारील भूसंपादनाबाबत आबासाहेबांना भेटण्यासाठी पुण्याहून भूसंपादन विभागातील अधिकारी, रस्त्याचे काम करणारे अधिकारी, कॉन्ट्रॅक्‍टर व त्या परिसरातील काही निवडक शेतकरी भेटायला आले होते. रस्त्याबाबत चर्चा व प्रश्नाची उकल झाल्यानंतर त्यांच्या गेटमधून बाहेर पडताना प्रथम श्रेणीतील ते अधिकारी आपल्या प्रश्नाबाबत बोलण्यापेक्षा "असा राजकारणी मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आमदार असतानाही एवढी साधी राहणी. आबासाहेब इज ग्रेट!' असे त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सामान्य असो वा मोठा मंत्री किंवा अधिकारी असो आबासाहेब त्यांच्या राहणीमानातून सर्वांनाच भावत होते.

चहा घेऊन जावा

त्यांचे संपर्क कार्यालय म्हणजे त्यांचे घर होते. दिवस-रात्र त्यांना भेटण्यासाठी अनेकजण येत असत. भेटण्यासाठी त्यांना कोणीही आले तरी आबासाहेब आवर्जून त्यांना जाताना "चहा घेऊन जावा' असे बोलत होते. त्यामुळे भेटण्यासाठी आलेल्यांना कोणताही बडेजाव जरी दिसून येत नसला तरी त्यांच्या चहाच्या आग्रहामुळे ते कायमच आठवणीत राहात होते.

रोहगार हमीवर काम करणारे स्वीय सहाय्यक

आबासाहेबांना माणसाची पारख अतिशय चांगल्या प्रकारे होती. त्यांनी आपले स्वीय सहाय्यक म्हणून अनिल खरात व ड्रायव्हर सलीम मुलाणी हे एकच ठेवले होते. पंचवीस वर्षे ते आबासाहेबांबरोबर राहिले आहेत. त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल खरात हे रोजगार हमीच्या कामावर काम करीत होते. "रोजगार हमीचे जनक' म्हणून तर आबासाहेबांची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात होती. आपली सर्व कामे पाहण्यासाठी पीए म्हणून रोजगार हमीवरील व्यक्तीची त्यांनी निवड केली. परंतु त्यांच्या पीएनेही त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पार पाडले. आबासाहेबांचे पार्थिव ज्या वेळी यांच्या निवासस्थानी आले, त्या वेळी त्यांचे स्वीय सहाय्यक व ड्रायव्हर यांनी मोठा हंबरडा फोडला होता. यातून आबासाहेबांचे आपल्या कामगारांवरील प्रेमाची जाणीव होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT