Adam_Master. 
सोलापूर

सरकार विरुद्ध एकजुटीची वज्रमूठ करा ! अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी भारत बंद यशस्वी करा : आडम मास्तर

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारत बंद यशस्वी करणे ही कामगारांची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने कामगारांना गुलाम बनवण्यासाठी 44 कामगार कायद्यात प्रतिगामी बदल करून चार श्रम संहितेत रूपांतर केले. वेठबिगारी आणखी किती दिवस करणार? सरकार विरुद्ध एकजुटीची वज्रमूठ करा. नाहीतर कामगार भुकेकंगाल होतील. आपण या देशाचे भूमिपुत्र आहोत गुलाम नाही. आपण आता अस्तित्वाची लढाई लढत आहोत. सरकारला धारेवर धरले पाहिजे म्हणून रस्त्यावरची लढाई हे आपल्या आंदोलनाचे शस्त्र आहे. 26 मार्च भारत बंद यशस्वी करा, असे आवाहन माकपचे नरसय्या आडम यांनी केले. 

बुधवारी दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालय येथे लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन्सच्या वतीने माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली 26 मार्च भारत बंद यशस्वी होण्यासाठी यंत्रमाग कामगारांची महत्त्वाची बैठक पार पडली. 

या वेळी श्री. आडम म्हणाले, यंत्रमाग कामगारांना लॉकडाउन काळातील आर्थिक सहाय्य 10 हजार रुपये मिळाले पाहिजेत. लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, जावळे समितीचा अहवाल जाहीर करून यंत्रमाग कामगारांना मागील फरकासह किमान वेतन लागू करा, भविष्य निर्वाह निधीची अंमलबजावणी जलद गतीने करावी, कामगार विरोधी कायदे रद्द करा आदी मागण्या सरकारने मान्य करायला हव्यात. यासाठी भारत बंदमध्ये सहभागी होऊन शासनाला आपली ताकद दाखवा. 

बैठकीत अनेक कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि 26 मार्च रोजी एमआयडीसी 100 टक्के बंद ठेवून भारत बंद यशस्वी करण्याची ग्वाही दिली. 

व्यासपीठावर शंकर गड्डम, युसूफ मेजर दीपक निकंबे, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख आदी उपस्थित होते. अनिल वासम, रामकृष्ण गुंड, भारत साळुंखे, नर्सप्पा चिम्मन, शरीफा शेख, मनीषा लोखंडे, मल्लम्मा तेलंग, श्रीनिवास गड्डम, प्रशांत उंडाले, लक्ष्मण पाटील, श्रीनिवास इंजामुरी, अंबादास जाधव आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT