former mla narayan patil demand to devendra fadnavis for banana research center solapur sakal
सोलापूर

Solapur News : शेलगाव येथे केळी संशोधन केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी; नारायण पाटील

माजी आमदार नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट

अण्णा काळे

करमाळा :करमाळा तालुक्यात केळी लागवडीचे क्षेञ साधारणपणे 7 हजार हेक्टर झाले असुन या भागातील केळी मोठ्याप्रमाणात निर्यात होत आहे.त्यामुळे शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करावे अशी  माजी आमदार नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली.

माजी आमदार नारायण पाटील यांनी मुंबई येथू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवण्याची मागणी केली आहे. याबाबत माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र निर्माण व्हावे अशी आपण 2018 पासुन मागणी करत आलो आहोत.

करमाळा तालूका हा जसा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो अगदी तसेच मागील काही वर्षांपासून करमाळा तालुक्यातील केळी लागवड व उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. उजनी बॅकवाटरसह तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांना आता केळी या पिकापासून आर्थिक फायदा मिळू लागला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा केळीचे क्षेत्र जास्त आहे. सन 2021-22 या वर्षात 6671 हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आले होते तर  सन 2022-23 या वर्षात यात वाढ होऊन 6978 हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. केळीचे सरासरी उत्पादक हे प्रति हेक्टरी 69 टन इतके आले.

यासाठी केळीच्या विविध जातीची 1 कोटी 32 लाख 75 हजार 136 इतक्या रोपांची लागवड करण्यात आली. यामुळे  तालुक्यात केळीचे  उत्पन्न  केळी बाबत अधिक माहिती मिळावी, केळीच्या नवीन जातींवर संशोधन व्हावे, केळीवरील रोग व किडीवर अत्याधुनिक औषधासह उपचार पद्धती शोधून काढता यावी म्हणून एका सुसज्ज केळी संशोधन केंद्राची गरज असुन आपण ही मागणी लावून धरली आहे.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच याबाबत कार्यवाही करु असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT