X MLA रमेश कदम  Sakal
सोलापूर

Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांना 6 वर्षानंतर जामीन! अण्णाभाऊ साठे महामंडळात केला होता गैरव्यवहार

बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी जामीन मंजूर केला.

तात्या लांडगे

सोलापूर : बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी जामीन मंजूर केला.

दरम्यान, माजी आमदार रमेश कदम यांची आजी बायम्मा गणपत क्षीरसागर (रा. नांदणी, ता. बार्शी) हिच्या नावे दुग्धव्यवसाय करण्यासाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढून ते वितरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. त्यातून शासनाची व महामंडळाची सहा लाख 36 हजार 658 रुपयांची फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी 31 मे 2017 रोजी सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावेळी पोलिसांनी रमेश कदम यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी ऍड. मिलिंद थोबडे यांच्या मार्फत जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रमेश कदम यांना जामीन मंजूर केला. अर्जदारतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ऍड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

(वडिलांचा 'हा' युक्तिवाद मान्य...) अर्जाच्या सुनावणीवेळी ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT