former mla ravikant patil son viraj crime of rape on pune actress police investigation  Sakal
सोलापूर

Solapur Crime : माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मुलावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल

सोलापूर येथे राहत असलेल्या माजी आमदार रविकांत पाटील यांचा मुलगा विराज यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्री तरुणीवर अत्याचार करुन तिच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकाविल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर येथे राहत असलेल्या माजी आमदार रविकांत पाटील यांचा मुलगा विराज यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्री तरुणीवर अत्याचार करुन तिच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकाविल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दखल करण्यात आला असून विराज रविकांत पाटील, (रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) असे गुन्हा करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिंगरे नगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात याबाबत शुक्रवारी (२६ जानेवारी) तक्रार दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला आहे.

आरोपी विराज पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांचे विराज हे चिरंजीव आहेत. पाटील हे कर्नाटक मधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तक्रारदार तरुणी अभिनेत्री आहे.

आरोपी आणि या तरुणीची ओळख फेसबुकवर झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर विराज हे तरुणीला टाळू लागले. त्यामुळे तक्रारदार तरुणीने त्याची विचारणा केली. त्यानंतर विराज पाटील यांनी तिला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याकडे असलेले पिस्तूल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तु जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो, मी कोण आहे? अशी धमकी देत धक्काबुक्की केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT