The former MPs of the constituency have paid attention to the demand for flyovers at two places in the taluka on the Ratnagiri-Nagpur highway. 
सोलापूर

मंगळवेढा तालुक्यात उड्डाणपुलांचे काय होणार? आजी माजी खासदारांनी दिलं निवेदन

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : रत्नागिरी नागपूर या महामार्गावर तालुक्यात दोन ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, या मागणीसाठी मतदारसंघाच्या आजी-माजी खासदारांनी लक्ष घातले. याबाबत त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणीदेखील केली आहे. त्यामुळे या मागणीची दखल पर्यटन मंत्री घेणार का? असा सवाल तालुक्यातील नागरिकातून व्यक्त केला जात आहे.

माचणूर येथील मुख्य चौकात उड्डाणपूल न करता मुख्य चौकापासून काही अंतरावर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संबंधित ठेकेदाराने ते काम करण्याचा प्रयत्न केला. तेथील ग्रामस्थांनी खा.जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे मुख्य चौकात उड्डाणपूल करावा. जेणेकरून रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे, शालेय विद्यार्थी व माचणूर येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी दक्षिण भागात असल्यामुळे त्यांना सोयीचे होण्याच्या दृष्टीने मुख्य चौकात उड्डाणपूल करावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या. त्याबाबतची वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी बोराळे, अरळी सिद्धापूर, मुंढेवाडी या गावासह मंगळवेढ्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीन पुर्व भागात असून उड्डाणपूल नसल्यामुळे त्यांना चार कि.मी अंतर जास्तीचे कापावे लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावे, यासाठीची मागणीचे निवेदन मा.खा. सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आले. त्यांनी या प्रश्नी लक्ष घातले असून त्यांनी बोराळेकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल करावे, या मागणीचे निवेदन वाहतूक मंत्री गडकरीना दिले. 

दोन वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल करावे. या मागणीचे निवेदन सोलापूरच्या आजी-माजी खासदारानी केंद्रीय वाहतूक मंत्री यांना दिले असले तरी तालुक्‍यातील महामार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात आहे. या मागणीची दखल कधी घेणार याची चर्चा मंगळवेढ्यात होत असताना सदर कामाचे सर्वेक्षण करत असताना संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी उड्डाणपूल करण्याबाबतची गोष्ट का लक्षात आली नाही? हा देखील प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकार मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?; जुलैचा तिसरा आठवडा ठरणार महत्वाचा; संभाव्य नावे समोर

Early Breast Cancer Care: अर्ली ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करायचा? तज्ज्ञांनी सांगितले ५ प्रभावी उपाय

Vinod Tawde: भाजप विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार? लवकरच मोठा निर्णय होणार; जाणून घ्या पडद्यामागच्या हालचाली

Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Hardik Pandya News : हार्दिकने 'Mumbai' सोडली! क्रिकेट करियर वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT