Lavangi
Lavangi Canva
सोलापूर

तब्बल 20 तासांनंतर चिमुकल्यांचे मृतदेह शोधण्यात यश; लवंगी गावावर शोककळा

तात्या लांडगे

वाहून गेलेल्या चौघांचा शोध घेताना सर्वप्रथम आरतीचा मृतदेह सापडला. पाण्यात वाहून जाताना समीक्षा व अर्पिता या दोघा बहिणींनी एकमेकींना मारलेली मिठी शेवटच्या श्‍वासापर्यंत सोडली नाही.

सोलापूर : लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील भीमा नदीच्या (Bhima River) पात्रात वाहून गेलेल्या चार चिमुकल्यांचे मृतदेह तब्बल 20 तासांनंतर सापडले. चिमुकल्यांचे मृतदेह पाहून मुलांच्या आईंनी हंबरडा फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. एकाचवेळी चौघांचा मृत्यू झाल्याने लवंगी गावातील लोक हळहळ व्यक्‍त करीत होते. (Four children drowned in the Bhima river basin in Lavangi)

शनिवारी (ता. 29) शिवानंद पारशेट्टी हे भीमा नदीत अंघोळीसाठी गेले होते. त्या वेळी त्यांचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती आणि बहीण सुमित्रा शिवाजी तानवडे यांच्या मुली समीक्षा व अर्पिता या दोघीही नदीवर गेल्या. नदी पात्रात पोहण्यासाठी सर्वजण उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते चारही जण एकमेकांना धरून वाहून जाऊ लागले. त्यावेळी शिवानंद यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांना हार पत्करावी लागली. वाहून गेलेल्या चारही चिमुकल्यांचे मृतदेह रविवारी (ता. 30) मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या सहकार्यातून शोधण्यात आले. शनिवारीही त्यांना शोधण्याचा प्रयत्न झाला; परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने व पाऊसही सुरू असल्यामुळे त्यांना शोधता आले नाही. रविवारी शोधकार्य हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम आरतीचा मृतदेह सापडला. त्यानंतर समीक्षा आणि अर्पिताचा मृतदेह सापडला. दुपारी पावणेएकच्या सुमारास शेवटी विठ्ठल या अकरा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळला. प्रांताधिकारी दीपक शिंदे, मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनीही घटनास्थळी तळ ठोकला होता. "एनडीआरएफ'चे पथक आणि सादेपूरच्या मानसिंग भोई या धाडसी तरुणांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आले.

"त्या' बहिणींनी शेवटपर्यंत सोडली नाही मिठी

भीमा नदीत पोहायला गेल्यानंतर काळाने चार चिमुकल्यांवर झडप मारली. हसत्या - खेळत्या पारशेट्टी व तानवडे कुटुंबीयांवर क्षणात शोककळा पसरली. दरम्यान, वाहून गेलेल्या चौघांचा शोध घेताना सर्वप्रथम आरतीचा मृतदेह सापडला. त्यानंतर दोन-अडीच तासांनी समीक्षा (वय 13) व अर्पिता (वय 9) यांचे मृतदेह आढळले. वाहून जाताना त्या दोघा बहिणींनी एकमेकींना मारलेली मिठी शेवटच्या श्‍वासापर्यंत सोडली नाही. मानसिंग भोई या तरुणाने खोल आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जाऊन त्या दोघींचे मृतदेह नदी काठावर आणले. सर्वात शेवटी विठ्ठलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT