Four new corona infested in Solapur 
सोलापूर

सोलापुरात चार नवीन कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तीची संख्या पासष्ट झाली असून आज नव्याने चार रुग्ण सापडले आहेत. हे चार कोरोना बाधित रुग्ण सोलापूर परिसरातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दोन रुग्ण शास्त्रीनगर परिसरातील, एक रुग्ण सिव्हील हॉस्पिटल परिसरातील व एक रुग्ण न्यू तिर्हे गाव (फॉरेस्ट चांदणी चौक) येथील असल्याची माहितीही त्यांनी दिली.


सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार 171 व्यक्ती या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये 740 जण असून आयसोलेशन वॉर्डातील एक हजार 280 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक हजार 75 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 205 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या एक हजार 75 रिपोर्ट मधील एक हजार 10 जण कोरोना निगेटिव्ह आहेत तर 65 जण पॉझिटिव्ह आहेत.

सोलापुरातील पाच व्यक्तींचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित 60 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे 23 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 19 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर चार रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल; राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

Latest Marathi News Live Update : भोंदू खरातला ट्रम्पचा एडव्हायझर नेमला असता- देवेंद्र फडणवीस

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

SCROLL FOR NEXT