Solapur Crime 
सोलापूर

सिगारेटचे भांडण पोचले पोलिसांत ! दारू पिण्यास पैसै न देणाऱ्यास चौघांची मारहाण 

तात्या लांडगे

सोलापूर : सलगर वस्ती पोलिस ठाणेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा, (कवठे) गोविंद तांडा याठिकाणी सुभाष बिल्लू चव्हाण यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. 10) रोजी घडली. 

चव्हाण हे आपल्या रिक्षातून शेतातील भाजीपाला आणण्यासाठी जात होते. त्या वेळी विक्रम शिवाजी राठोड याने त्यांची रिक्षा अडवली आणि दारू पिण्यास पैसे मागितले. पैसे न दिल्यास तुझी रिक्षा पुढे जाऊ देणार नाही, तुला बघून घेतो, अशी दमदाटीही केली. त्यानंतर विशाल शिवाजी राठोड, दिनेश नामदेव राठोड, आकाश नामदेव राठोड या सर्वांनी मिळून चव्हाण यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत पाठीवर चावा घेतला. त्या वेळी चव्हाण यांची सासू भांडण सोडविण्याकरिता आल्यानंतर संशयित आरोपींनी पत्नी व सासू यांना ढकलून दिले. त्या वेळी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

सिगारेट न दिल्याने दोघांकडून मारहाण 
प्रभाकर महाराज मंदिराजवळील बुधवार पेठ परिसरातील पान टपरीवर उमेश नामदेव जाधव आला. त्याने नागेश शिवाजी शिवशरण यांना सिगारेट मागितली. त्या वेळी आमच्या दुकानात सिगारेट नाही, असे समजावून सांगत असताना उमेश जाधवने तू सिगारेट का देत नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. त्या वेळी पूजा उमेश जाधव हिने देखील नागेश शिवशरण यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर उमेशने दुकानातील काउंटरमधून बाराशे रुपयांची रोकड काढून घेतली, असेही शिवशरण यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार उमेश जाधव व पूजा जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई 
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मजरेवाडी परिसरातील लोकमान्य नगरात घरगुती गॅसचा वापर इलेक्‍ट्रिक मोटारीद्वारे वाहनाचे इंधन म्हणून करताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. समीर शेख असे या संशयित आरोपीचे नाव आहे. ज्वलनशील वस्तू स्फोटक पदार्थ असलेल्या घरगुती गॅसचा वापर हयगयीने व बेदरकारपणे इंधन म्हणून केल्याचा ठपका पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन गॅस टाक्‍या, इलेक्‍ट्रिक वजन काटा, इलेक्‍ट्रिक मोटर, इलेक्‍ट्रिक बोर्ड असा आठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस शिपाई शशिधर हुंडेकरी यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदवली असून पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

मोदी परिसरातील मुलीचा दारूड्याकडून विनयभंग 
परराज्यातून सोलापुरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी मोदी परिसरातील एका दारूड्या तरुणाविरुद्ध सदर बझार पोलिसातं "पोस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 10) रात्री झोपेत असलेल्या त्या मुलीच्या घरात शिरून दारूड्याने त्या मुलीचा हात धरला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. मुलीच्या आई-वडिलांच्या फिर्यादीनुसार या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT