solapur sakal
सोलापूर

Solapur (Karmala) : भीषण अपघात ; चार जण जागीच ठार

कर्नाटक राज्यातुन शिर्डी येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कार व कंटेनर याच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi), आण्णा काळे

करमाळा : येथे कर्नाटक राज्यातुन शिर्डी येथे दर्शनासाठी निघालेल्या परांडा- करमाळा मार्गावर आज बुधवार ता.27 रोजी पहाटे कर्नाटक राज्यातुन शिर्डी येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कार व कंटेनर याच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. पहाटे साधारणपढे साडेपाच वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या आपघातात

श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्येमी दीपक हुनशामठ (३८ रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) हे चार जण जागीच ठार झाले आहेत.तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशाल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) अशी जखमीची नावे आहेत.

कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार तर सहाजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली आहे. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी तात्काळ अपघात तळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली .जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडेजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT