PDR Accident. 
सोलापूर

कासेगावजवळ भीषण अपघात ! कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील पाचजण ठार; अकरा जखमी 

भारत नागणे/अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरला श्री विठ्ठल - रुक्‍मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगी अशा पाचजणांचा जागीच मृत्यू झाला; तर तब्बल 11 जण जखमी झाले आहेत. 

हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कासेगाव परिसरात (सातवा मैल) घडला. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

याबाबतची माहिती अशी की, चंदगड (कोल्हापूर) येथील 16 भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल - रुक्‍मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच कासेगावजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता, की बोलेरोचा चेंदामेंदा झाला. 
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

पंढरपूर- सांगोला रस्त्यावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली आहे. सर्व पाच मृत व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील बाद्राई कडवळे गावचे आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी बोलेरो जीपमधून हे सर्व 16 जण पंढरपूरकडे येत असताना हा अपघात झाला. 

अपघातातील मृतांची नावे : सखाराम धोंडीबा लांबोर (वय 50), श्‍यादूबाई लक्ष्मण लांबोर (वय 62), पिंकी ऊर्फ सुनीता ज्ञानू लांबोर (वय 11), नागूबाई काळू लांबोर (वय 62) व तुकाराम खंडू कदम (वय 50). 

अपघातातील अकरा जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : धोंडीबा बापू लांबोर (वय 87), कोंडदेवा बापू लांबोर (वय 7), कोमल बापू लांबोर (वय 7), बबन लांबोर (वय 45), भारती बापू लांबोर (वय 54), रोहित यशवंत कांबळे (वय 20), बापू काळअप्पा लांबोर (45), कोंडीबा विठ्ठल लांबोर (वय 5), काळूलाल लांबोर (वय 70), नागूबाई ज्ञानू कोकरे (वय 50), धोंडीबा सखाराम डोईफोडे (वय 60). 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT