coronavirus-shutterstock.jpg 
सोलापूर

दिलासादायक! सोलापुरातील चार हजार 169 रुग्ण कोरोनामुक्‍त; आज 60 रुग्ण वाढले 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांचा टक्‍का कमी झाला आहे. मात्र, दररोज 50 च्या सरासरीने रुग्णांची भर पडू लागली आहे. तरीही टेस्टिंगचे प्रमाण वाढलेले नाही. मंगळवारी (ता. 11) प्राप्त झालेल्या अहवालानुसार 690 व्यक्‍तींच्या अहवालातून 60 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात दररोज तीन हजारांहून अधिक व्यक्‍तींची टेस्ट केली जात असून त्यातून सरासरी तीनशे रुग्ण आढळत आहेत. दुसरीकडे मात्र, शहरातील टेस्टिंग कमी झाले आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 38 हजार 891 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात पाच हजार 520 रुग्णांना झाला कोरोना 
  • शहरातील चार हजार 169 रुग्णांची कोरोनावर मात; आज 104 रुग्ण घरी परतले 
  • आतापर्यंत 383 रुग्णांचा मृत्यू; 968 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  •  

अक्‍कलकोट रोडवरील नितीन नगर, क्रांती सैनिक सोसायटी, हराळे नगर, अशोक नगर, महालक्ष्मी नगर, समर्थ सोसायटी (विजयपूर रोड), सुंदर नगर, रेल्वे लाईन, देशमुख वस्ती, आर्य चाणक्‍य नगर (जुळे सोलापूर), गदगी नगर (हैदराबाद रोड), पाटील नगर, वसंत विहार, हब्बू वस्ती, चेतना बिल्डिंग (शेटे नगर), चातक सोसायटी, सरस्वती चौक (लष्कर), कृष्णा पार्क (आरटीओ कार्यालयाजवळ), गरिबी हटाव झोपडपट्टी क्र-एक, शंकर नगर (होटगी रोड), हनुमान मंदिराजवळ, लक्ष्मी मंदिराजवळ (कल्याण नगर), हजरत बिलाल नगर, प्रियंका नगर (सैफूल), समर्थ सोसायटी (एसआरपी कॅम्प), आदर्श नगर, महात्मा फुले नगर (मजरेवाडी), भैय्या चौक येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. 
 

एसआरपी कॅम्प शासकीय वसाहतील 17 रुग्ण 
शहरात आज नव्याने 60 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये कल्याण नगरातील सहा तर एसआरपी कॅम्प शासकीय वसाहतीतील तब्बल 17 रुग्णांचा समावेश आहे. विजयपूर रोडवरील अशोक नगर, समर्थ सोसायटी (एसआरपी कॅम्प), समर्थ सोसायटी या ठिकाणी प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT