Four years later Leap Day 
सोलापूर

२९ फेब्रुवारीला जन्म झालेल्यांचा वाढदिवस कसा असतो वाचा... (Video)

सुस्मिता वडतिले

सोलापूर : यंदाचे 2020 हे लीप वर्ष आहे. वर्षातील फेब्रुवारी महिन्याव्यतिरिक्‍त अन्य महिने 30 किंवा 31 दिवसांचे असतात. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. परंतु लीप वर्ष आले असता एक दिवस वाढून तो 29 दिवसांचा होतो. या दोन दिवशी ज्यांचा जन्म असतो ते त्यांचा आनंद व्दिगुणित करणारा "लीप डे' म्हणून साजरा करतात. 
एखाद्या व्यक्तीचा 29 फेब्रुवारीला वाढदिवस असेल तर त्याची पंचाईत होते. कारण, त्याला आपला वाढदिवस चार वर्षांनी साजरा करावा लागतो. चार वर्षांतून वाढदिवस करणारे हा दिवस किती आनंदाने साजरा करत असतील. 29 फेब्रुवारीला वाढदिवस येणाऱ्यांना एकप्रकारे कमनशीबच म्हणावे लागेल. कारण, त्यांना तो साजरा करण्याची संधी तब्बल चार वर्षांनी उपलब्ध होते. याखेरीज त्यांना तो आदल्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी साजरा करावा लागतो. 
 
यांचा आज जन्मदिन 
29 फेब्रुवारीला वाढदिवस असलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावे अशी : भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई, प्रसिद्ध नृत्यांगना रुक्‍मिणीदेवी, माजी भारतीय हॉकीपटू ऍडम सिनक्‍लेर यांचा उल्लेख करावा लागेल. 
 
चार वर्षानंतर पहिला वाढदिवस...
माझा जन्म 2016ला झाला. तब्बल चार वर्षांतून आज पहिला वाढदिवस साजरा करत असल्याने खूप आनंद होत आहे. मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. 
- स्वराज कदम 

१ मार्चला वाढदिवस....
माझा जन्म 1996 ला झाला. या दिवशी जन्म झाल्याने मला खूप अभिमान वाटतो. आम्ही 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्चलाच वाढदिवस साजरा करतो. पुन्हा लीप इयर केव्हा येईल याची आतुरतेने वाट - पाहतो. आपण सर्वांपेक्षा स्पेशल आहोत याची जाणीव होते. 

- नरेश पल्ले 

सर्वांपेक्षा वेगळा आनंद....
माझा जन्म 1976ला झाला. आम्ही 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्चलाच वाढदिवस साजरा करतो. माझ्या वाढदिवसाला रक्तदान करतो. तसेच अनाथ आश्रमास भेट देऊन कुटुंबाच्या आनंदासाठी वाढदिवस साजरा करतो. पुन्हा लीप इयर आल्यानंतर माझ्या कुटुंबातील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मिळून मला सरप्राइज देतात. सर्वांपेक्षा वेगळे आहोत याचा अभिमान वाटतो. यामुळे मी देवाचे आभार मानतो की यादिवशी माझा जन्म झाला. 
- डॉ. शांतीनाथ बागेवाडी 

आईला मी नेहमी म्हणतो...
माझा जन्म 1996ला झाला. आपल्या वाढदिवसाच्या या तारखेचा विचार केला असता सुरवातीला वाईट वाटते. परंतु, कधीकधी आनंद होतो. सर्वांपेक्षा आपण वेगळे आहोत. मी माझ्या आईला नेहमी म्हणतो, एक दिवस अगोदर किंवा नंतर माझा जन्म व्हायला हवा होता. मी कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवस उत्साहाने साजरा करतो. 
- प्रशांत हारके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT