Satishila 
सोलापूर

गावडी दारफळचा उलगडणार हजार वर्षांचा इतिहास ! सापडली चौदाव्या शतकातील दुर्मिळ सतीशिळा

दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावडी दारफळ हे पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या सीमेवरील दुर्लक्षित असणारं तीन हजार लोकवस्तीचे गाव. नुकतेच येथील खंडोबा मंदिरापुढे शके 1312 सालची एक सतीशिळा सापडल्याने गावाचा एक हजार वर्षांचा इतिहास उलगडणार असल्याचे मत महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश कदम यांनी "सकाळ'ला सांगितले. 

डॉ. कदम म्हणाले, गावडी दारफळ तसे अलिप्त असणारे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ते कधी प्रकाशात आलेले नाही. गावात खंडोबा मंदिराच्या समोर एक सतीशिळा सापडली असून, त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. त्या शिळेवर कोपरात दुमडलेला बांगड्या घातलेला हात असून त्यावर शके 1312 प्रमोद संवस्तर लिहिलेले आहे. इतर अक्षरे वाचण्याचे काम चालू आहे. सतीशिळेवर शिलालेख असून अशा प्रकारचा शिलालेख दुर्मिळ मानला जातो. यावरून तेराव्या - चौदाव्या शतकात गावडी दारफळ हे मोठे धार्मिक केंद्र असून, खंडोबा मंदिर परिसर हा मंदिराचा समूह असावे. कारण, मंदिरालगत प्राचीनकालीन गावतळे, एक प्राचीन विहीर तसेच अनेक वीरगळ आढळून येतात. 

गावडी दारफळला भक्कम तटबंदी आणि आजही मजबूत असणारी वेस असून, गावात असणारे पांढऱ्या मातीचे बुरूज आणि जुन्या काळातील रथाची चाके गावाच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. गावातील बारा बलुतेदारांची वस्तीही त्याला पूरक आहे. "गावडा' हा शब्द कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात असून, गावडा म्हणजे गाव कारभारी असा त्याचा अर्थ होतो. त्यावरून कोणत्या कारभाऱ्याचे दारफळ, हे सिद्ध होत नसले तरी सापडलेल्या सतीशिळेवरून गावावर फार मोठे धार्मिक संकट आलेले असताना त्यांना विरोध करताना गावातील अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यांच्या स्मरणार्थ वीरगळ तर गावच्या मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची पत्नी सती गेली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ सतीशिळा कोरून ठेवलेली आहे. सतीशिळेवरील अक्षरे काही प्रमाणात अस्पष्ट असून तज्ज्ञांकडून लवकरच त्याचे वाचन करून गावच्या इतिहासाचा नवा अध्याय जोडणार असल्याचे मतही डॉ. सतीश कदम यांनी सांगितले. 

गावडी दारफळ हे माझे जन्मगाव असून, गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासात संशोधन करून कित्येक गावाला नवा इतिहास दिला. मात्र माझ्याच गावाला प्राचीन इतिहास नसावा याची खंत होती. मात्र या सतीशिळेने गावडी दारफळला वैभवशाली इतिहास असून, गावच्या रक्षणासाठी दारफळच्या वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे, अशा गावडी दारफळचा सार्थ अभिमान वाटतो. तसेच गावडी दारफळचा हजारो वर्षांचा इतिहास उलगडणार आहे, त्याचा आनंदच आहे. 
- डॉ. सतीश कदम, 
अध्यक्ष, महाराष्ट्र इतिहास परिषद 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT