free food donation to devotees in Ashadhi Wari 2024 by cm eknath shinde Sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2024 : मुख्यमंत्री शिंदेंकडून आषाढी वारीत भाविकांना अन्नदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आषाढी वारीदरम्यान पंढरीतील लाखो भाविकांना स्वखर्चातून १६ ते १८ जुलै असे सलग तीन दिवस मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आषाढी वारीदरम्यान पंढरीतील लाखो भाविकांना स्वखर्चातून १६ ते १८ जुलै असे सलग तीन दिवस मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी आषाढी यात्रा कालावधीमध्ये पाच लाख भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला होता.

त्यामुळे यावर्षीही जास्तीत जास्त भाविकांना भोजनाचा लाभ मिळावा यासाठी शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आणि ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या देखरेखीखाली भोजन मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आषाढी यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविकांना मोफत भोजन देण्यात येत आहे. मागील वर्षी भक्ती मार्गावर एकच भोजन मंडप उभारण्यात आला होता.

मात्र यंदा प्रथमच दोन ठिकाणी अन्नदान केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यापैकी एक केंद्र चंद्रभागा बसस्थानका शेजारील पालखी मार्गांवर तर दुसरे गजानन महाराज पिछाडीला नवीन भक्त निवास समोर उभारण्यात येत आहे.

वरील दोन्ही केंद्राची उभारणी महेश साठे यांच्या देखरेखीखाली सुरू असून भोजन मंडपाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यात्रेदरम्यान १६ ते १७ जुलै असे तीन दिवस मोफत भोजन वाटप होणार आहे. यामध्ये पाणी बाटली, सरबत बाटली आणि पंचपक्वानाचे भोजन देण्यात येणार आहे.

त्यासाठी उभारण्यात आलेल्या भोजन मंडपासह इतर सर्व सोयीसुविधांचा राम रेपाळे व महेश साठे यांनी रविवारी (ता.१४) आढावा घेतला. याप्रसंगी शिवसेनेचे ठाणे उपशहर प्रमुख जयप्रकाश कोठवणी, ठाणे शाखा प्रमुख रोहित कदम, सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख मुबीना मुलाणी,

युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियांका परांडे, महेश ताठे, विक्रम आसबे, प्रमिला कुराडे, शिवानंद कठीमनी, नितीन पवार, आनंद उपाध्ये, कुमार परांडे, शुभम लिमकर, पल्लवी जन्मले, वैशाली काळे,किसन काळे, सिद्धेश्वर शिंदे, किसन काळे, अमोल भोसले, शिवतेज चव्हाण, बाळासाहेब भोसले सुरेश पवार आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT