Free ST bus to release those stranded due to lockdown 
सोलापूर

ठाकरे सरकारचा 'हा' निर्णय मोदी सरकारला वरचढ! लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना मूळगावी सोडण्यासाठी मोफत लालपरी

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्रात परराज्यातील अडकलेल्या परप्रांतीयांना व विविध जिल्ह्यातील व्यक्तींना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला 21 कोटी रुपये दिले आहेत. देशभरात अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी पोहोच करण्यासाठी केंद्र सरकारने मोफत रेल्वेची सोय करावी, अशी मागणी होऊनही मोदी सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सागर व्यवस्थापकाकडे दिलेल्या यादीनुसार प्रत्येक बसमधून 22 प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्रातील मुंबई-पुण्यासह इतरत्र अडकलेल्या 15 ते 18 लाख परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 1000 रेल्वे गाड्यांची सोय करावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती. मात्र, त्याप्रमाणात गाड्या उपलब्ध होत नसल्याने त्यातील बहुतांश प्रवाशांनी आता पायी प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्गावरून जाणार आहेत, त्या मार्गावर पायी चालत जाणारे लोक आढळल्यास त्यांनाही बस मधून घेऊन जावे, असे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. बसमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास त्याची माहिती संबंधित आगार व्यवस्थापकांना देऊन जिल्ह्यातील प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत त्यांना त्यांच्या मूळगावी सोडण्याची व्यवस्था करावी, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

मोफत रेल्वेचा निर्णय पेंडिंगच
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह कामगार, यात्रेकरूंना त्यांच्यामुळे राज्यातील मूळगावी पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र, मागील दीड महिन्यांपासून हाताला काम नसतानाही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा बोज खांद्यावर घेणाऱ्या बहुतांशी मजुरांकडून तिकिटासाठी पैसे नाहीत. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने तथा मोदी सरकारने या परप्रांतीयांना रेल्वेद्वारे मोफत त्यांच्या मूळगावी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेससह देशातील राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झाला नसताना ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT