bibtya 
सोलापूर

नरभक्षक बिबट्याने वळवला चोरगे वस्तीकडे मोर्चा ! ऊसतोड बंद; मजुरांची स्थलांतराची मागणी 

गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : ऊसतोडणी मजुराच्या लहान बालिकेवर हल्ला केल्यानंतर पेटलेल्या उसाच्या फडातून पळालेला बिबट्या शेटफळ गावाच्या केळीच्या शिवारात गेला. त्यानंतर शेटफळ शिवारात गावाजवळील दुसऱ्या उसाच्या टोळीजवळ रात्री आठ वाजता दिसला. नंतर दहा वाजता लबडे यांच्या वस्तीवर एका महिलेवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर सकाळी आठ वाजता चोरगेवस्ती परिसरात दिसल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले असून, ऊसतोडणी मजूर ऊसतोडणी करण्यास तयार नाहीत. 

बिबट्याच्या दहशतीमुळे शेटफळ परिसरातील शेतातील वस्तीवर शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली तर ऊसतोडणी मजुरांनी ऊसतोड बंद ठेवली असून, ते ऊसतोडीसाठी फडात जाण्यास तयार नाहीत. अनेक टोळ्यांनी या भागातून दुसरीकडे आम्हाला हलवण्यात यावे, अशी मागणी कारखान्याकडे केली आहे. शेतकरीही शेतात जाण्यास घाबरत असून, सर्वत्र भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. 

भोकरबर्डी (ता. धारणी, जि. अमरावती) येथील ऊसतोड मजूर दिलीप मंसारामधिकार म्हणाले, आम्ही ऊसतोड करत असलेल्या भागात बिबट्या असून, तो लोकांवर हल्ला करत आहे, अशी माहिती मिळाली आहे. आमची लहान लहान मुले आमच्या सोबत असल्याने आम्हाला भीती वाटत असून, सध्यातरी आम्ही ऊसतोड बंद केली आहे. 

शेटफळ (ता. करमाळा) येथील ऊस वाहतूकदार अशोक पोळ म्हणाले, शेटफळ परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, याच भीतीचे या परिसरातील सर्व कारखान्यांच्या ऊसतोडी बंद झाल्या आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या ऊस पुरवठ्यावर परिणाम होणार असून, तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा. 

डॉग स्कॉडमार्फत पाठलाग सुरू 
ऊसतोड मजुरांना आज (मंगळवारी) चोरगेवस्ती (शेटफळ) परिसरात बिबट्या दिसल्याने आता वनविभागाने त्या परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे. बिबट्याच्या ठशांचा माग घेऊन डॉग स्कॉडमार्फत त्याचा पाठलाग सुरू केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT