collcetor solapur 
सोलापूर

सोलापुरात सोमवार ते गुरुवारपर्यंत संपूर्ण संचारबंदी 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (सोमवार) दुपारी 2 वाजल्यापासून ते गुरुवारी (ता. 23) रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील सर्व हद्दीत बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. 
या कालावधीत सोलापूर शहरातील सर्व अस्थापना व शहराच्या सर्व हद्दीत बंद करण्यात येणार आहेत. या आदेशातून अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा पुरवणारे खासगी, सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्‍टर, वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी, त्यांची वाहने तसेच एसएआरआय, आयएलआय व कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग यासंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी, ऍम्ब्युुलन्स सेवा, रुग्णालयांत व दवाखान्याच्या संलग्न असणारी औषधांची दुकाने व अन्य औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळी सुरू असतील. कायदेशीर कर्तव्य बजावण्यात असणारे अधिकारी व कर्मचारी (उदा. पाणीपुरवठा, अग्निशमन, विद्युत पुरवठा, पोलिस विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी) यांना या संपूर्ण संचारबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT