Funding has been sanctioned for the construction of the Competitive Examination Study Center building 
सोलापूर

स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या इमारत बांधकामाच्या निधीस मंजुरी

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या इमारत बांधकामासाठी 52 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी दिले.

शहरात असलेल्या अग्निशामक दलाच्या इमारतीमध्ये शहरातील जे इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अभ्यास केंद्र सुरू केले. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अग्निशामन कामाला होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

सोलापूर रोडवरील दामाजी महाविद्यालयासमोर असलेल्या सिटीसर्वे गट क्रमांक 252 मधील मोकळ्या जागेत हे अभ्यास केंद्र उभे केले जाणार आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार असून भविष्यात या विद्यासाठी ई-अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती नियोजन मंडळ सदस्य जगताप यांनी दिले. 

सदर कामासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, दिपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, ओबीसी सेल लतीफ तांबोळी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा नियोजन अधिकारी दत्तात्रय दराडे, नगराध्यक्षा अरुणा माळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव बांधकाम समितीचे सभापती प्रवीण खवतोडे, आरोग्य समिती सभापती संकेत खटके, नियोजन समिती सभापती अनिल बोदाडे, महिला बालकल्याण सभापती भागीरथी नागणे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी सहकार्य केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT